अनधिकृत बॅनर, होर्डिंग्जविरोधात कठोर धोरण आखा

अनधिकृत बॅनर, होर्डिंग्जविरोधात कठोर धोरण आखा
Published on: 

अनधिकृत बॅनर, होर्डिंगविरोधात कठोर धोरण आखा
आमदार अमित साटम यांचे महापौरांना पत्र; संयुक्त बैठक घेण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : शहर आणि उपनगरांत मोठ्या प्रमाणावर उभारण्यात येणाऱ्या अनधिकृत बॅनर आणि होर्डिंगमुळे मुंबईचे विद्रूपीकरण होत असून, हे जाहिरात फलक कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर अनधिकृत जाहिरात फलकांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी महापालिकेने निश्चित धोरण आखावे, अशी मागणी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी महापौर रितू तावडे यांच्याकडे केली आहे.
मुंबईतील विविध भागांत परवानगीविना बॅनर, होर्डिंग आणि जाहिरात फलक उभारले जात असल्याचे साटम यांनी पत्रातून निदर्शनास आणून दिले आहे. उच्च न्यायालयाने याबाबत स्पष्ट निर्देश दिलेले असतानाही अनधिकृत जाहिरात फलकांवर अपेक्षित कारवाई होत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. अनधिकृत फलक उभारणाऱ्यांवर केवळ दंडात्मक कारवाई न करता संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
दरम्यान, मुंबईतील विजेच्या खांबांचा नियोजनबद्ध पद्धतीने वापर करून त्यावर महापालिकेच्या माध्यमातून प्रमाणित आकाराचे जाहिरात फलक उभारता येऊ शकतात, अशी सूचना साटम यांनी केली आहे. हे जाहिरात फलक भाडेतत्त्वावर दिल्यास महापालिकेला अतिरिक्त महसूल मिळू शकतो, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

संयुक्त बैठकीची मागणी
अनधिकृत जाहिरात फलकांना आळा घालण्यासाठी तसेच अधिकृत जाहिरातींसाठी पारदर्शक आणि निश्चित धोरण तयार करण्याच्या दृष्टीने महापौर, प्रशासन आणि संबंधित विभागांची संयुक्त बैठक आयोजित करावी, अशी मागणी साटम यांनी केली आहे. या बैठकीत धोरण निश्चित करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्रशासनाला द्यावेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com