गोरेगाव फिल्मसिटीत स्टुडिओच्या सेटला आग

गोरेगाव फिल्मसिटीत स्टुडिओच्या सेटला आग
Published on: 

गोरेगाव फिल्मसिटीत स्टुडिओच्या सेटला आग
​
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : गोरेगाव (पूर्व) येथील फिल्मसिटी परिसरातील ‘प्राइम फोकस’ आणि ‘रिलायन्स मीडिया वर्क्स’च्या मागे उभारण्यात आलेल्या एका तात्पुरत्या शूटिंग सेटला सोमवारी (ता. ५) दुपारी भीषण आग लागली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा कोणीही जखमी झाले नाही.
​अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी ४:०२ वाजताच्या सुमारास आगीची ही घटना घडली. सुमारे १०० बाय २० फूट आकाराच्या ‘पीसीआर’ युनिटमध्ये ही आग लागली. आगीत विजेचे वायरिंग, इलेक्ट्रिक उपकरणे, केबल्स, लाकडी साहित्य, एसी युनिट्स, बांबू, प्लॅस्टिक साहित्य, साउंड सिस्टीम आणि शूटिंगचे इतर महत्त्वाचे साहित्य जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच मुंबई महापालिकेचे अग्निशमन दल, स्थानिक पोलिस, पालिकेचे विभाग नियंत्रण कक्ष आणि १०८ रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाने या घटनेला ‘लेव्हल-१’ची आग म्हणून घोषित केले होते. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत दुपारी ४:५५ वाजेच्या सुमारास आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलिस आणि अग्निशमन दल अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com