विद्यार्थ्याला अंमली पदार्थाचे इंजेक्शन टोचल्याची तक्रार

विद्यार्थ्याला अंमली पदार्थाचे इंजेक्शन टोचल्याची तक्रार
Published on: 

विद्यार्थ्याला अमली पदार्थाचे इंजेक्शन टोचल्याची तक्रार
घाटकोपर, ता. ६ (बातमीदार) : घाटकोपर पश्चिम भागातील एका अल्पवयीन मुलाला सोमवारी (ता. ५) सायंकाळी त्याच्याच शाळेतील चार मुलांनी अमली पदार्थाचे इंजेक्शन टोचल्याचा आरोप करण्यात आला आहे, मात्र ते इंजेक्शन नसून, सुईसारखी टोकदार वस्तू असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहितीही पोलिसांनी दिली.

पालिकेच्या ३ नंबर बर्वेनगर शाळेत शिकणारा यश चौरसिया हा विद्यार्थी महापालिकेच्या उद्यानात सोमवारी (ता. ५) सायंकाळी खेळत होता. त्या वेळी त्याच्याच शाळेत शिकत असलेल्या चार अल्पवयीन मुलांनी त्याला चाकू दाखवून ‘प्रेम गल्ली’ कॉलनीत नेऊन त्याच्या मानेत इंजेक्शन टोचले, अशी तक्रार या मुलाने आपल्या पालकांकडे केली. या घटनेनंतर या मुलगा बेशुद्ध झाल्याचे राजेश सावंत या सामाजिक कार्यकर्त्याने सांगितले. या मुलाला पालिकेच्या मुक्ताबाई रुग्णालयामध्ये दाखल केले. त्यानंतर घाटकोपर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल आर्डेकर यांनी मुलाची भेट घेतली. हे कृत्य करणाऱ्या मुलांतील एक जण आपल्या ओळखीचा असून, सर्व मुले एकाच शाळेत शिकतात, असे या पीडित विद्यार्थ्याचे म्हणणे आहे, तर दुसरीकडे आर्डेकर यांनी सांगितले की, ‘मुलाला सुईसारखी टोकदार वस्तू मानेवर टोचली असली तरी त्याला दुखापत झालेली नाही. तसेच अमली पदार्थाची सुई टोचल्याची येथील डॉक्टरांनीही पुष्टी केली नाही. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.’ दरम्यान, ‘अमली पदार्थविरोधी मोहीम तीव्र करण्यासाठी येत्या रविवारी निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. अमली पदार्थ पुरवणाऱ्या पेडलरवर आणि आरोपींवर कठोर कारवाई होण्यासाठी या मोर्चाचे आयोजन केले आहे.’ असे ‘मोकळा श्वास फाउंडेशन’चे अध्यक्ष राजेश सावंत यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com