

सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धेत
शालेय विद्यार्थ्यांनीही सहभाग घ्यावा
मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे आवाहन
मुंबई, ता. ६ : केंद्रीय कौशल्य विभागामार्फत ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ या बहुराज्यीय नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग महाराष्ट्र शासनातर्फे या स्पर्धेत शालेय विद्यार्थ्यांनीही सहभाग घ्यावा, यासाठी सोलापूर येथील स्टेट इनोव्हेशन एंड रिसर्च फाउंडेशनचे सहकार्य मिळणार आहे. यामुळे नावीन्यता क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.
मंत्रालयात सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज या स्पर्धेत राज्यातील जिल्हा परिषद शालेय स्तरावरही सहभाग वाढावा, यासाठी स्टेट इनोव्हेशन एंड रिसर्च फाउंडेशन (सर) यांच्यासोबतच्या बैठकीत मंत्री लोढा बोलत होते. लोढा म्हणाले, ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’साठी २१ सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, १७ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. या स्पर्धेत नवोन्मेषक, विद्यार्थी, विद्यार्थी गट, संशोधक, प्राध्यापक, स्टार्टअप्स, एमएसएमई, कंपन्या, सामाजिक संस्था, शैक्षणिक व संशोधन संस्था तसेच इतर इनोव्हेशन टीम्स या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.
नावीन्यपूर्ण संकल्पनांची निवड
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये स्थानिक समस्या समजून घेण्याची आणि त्यावर सर्जनशील उपाय शोधण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात आहे. ही क्षमता केवळ शालेय प्रकल्पांपुरती मर्यादित न राहता प्रत्यक्ष समाजोपयोगी नवकल्पनांमध्ये रूपांतरित व्हावी, हा ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चा प्रमुख उद्देश असल्याचे मंत्री लोढा यांनी सांगितले. या स्पर्धेत १० प्रमुख क्षेत्रांतील प्रत्येकी पाच उपक्षेत्रांमधून नावीन्यपूर्ण संकल्पनांची निवड केली जाणार आहे. अशा एकूण ५० विजेत्यांना प्रत्येकी १० लाख रुपयांची वर्क ऑर्डर देण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.