वाढवण बंदर बैठकीवर बहिष्कार

वाढवण बंदर बैठकीवर बहिष्कार
Published on: 

मुंबई, ता. ७ : वाढवण बंदराच्या प्रश्नावर मंत्रालयात मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीवर अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीसह संबंधित मच्छीमार संघटनांनी बहिष्कार टाकला. बैठकीचे निमंत्रण ऐन दिवशी व्हॉट्सॲपवर देण्यात आल्याने पालघरमधून मंत्रालयात पोहोचणे शक्य नसल्याचे समितीने म्हटले आहे. बैठकीचा अजेंडा आणि चर्चेचे विषयही आधी कळविण्यात आले नसल्याचा आरोप समितीने केला.

वाढवण बंदर हा मच्छीमारांच्या उपजीविकेशी संबंधित महत्त्वाचा प्रश्न असताना त्यांना विश्वासात न घेता घाईघाईने बैठक घेणे योग्य नसल्याची भूमिका समितीने घेतली. बैठक पुढे ढकलून स्पष्ट अजेंडा आणि आवश्यक कागदपत्रे मच्छीमार प्रतिनिधींना आधी उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी समितीने केली आहे.

गुन्हे दाखल केल्याचा आरोप
वाढवण बंदराला विरोध करणाऱ्या भूमिपुत्रांवर गुन्हे दाखल करून त्यांना न्यायालयीन प्रक्रियेत अडकविले जात असल्याचा आरोप समितीने केला. एकीकडे आंदोलनकर्त्यांना समन्स बजावले जात असताना दुसरीकडे बंदरासंदर्भात शासकीय बैठका घेतल्या जात असल्याबद्दल समितीने नाराजी व्यक्त केली.

निर्णय लादण्याचा प्रयत्न हाणून पाडू
मच्छीमारांना विश्वासात न घेता कोणताही निर्णय लादला जाणार असेल, तर तो आम्ही स्वीकारणार नाही. मच्छीमारांना परप्रांतीय समजून घेतले जाणारे निर्णय खपवून घेतले जाणार नाहीत. आमचा आवाज दडपून वाढवण बंदराचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न झाल्यास तो हाणून पाडू, असा इशारा अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com