पिण्याच्या पाण्याला प्राधान्य

पिण्याच्या पाण्याला प्राधान्य
Published on: 

पिण्याच्या पाण्याला
प्राधान्य : महापौर
मुंबई, ता. ७ : यंदा पाऊस कमी झाला, तरी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत ९५ टक्के साठा आहे. एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पुढील पावसाळ्यापर्यंत पाणी पुरवण्यासाठी नियोजन करावे लागणार आहे. टंचाईच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे, त्यानंतर इतर वापराचा विचार करण्यात येईल. मुंबईकरांनी मात्र पाण्याचा काटकसरीने वापर करावा. मुंबईत सध्या लागू असलेली १० टक्के पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या निर्देशानुसार घेण्यात, अशी माहिती महापौर रितू तावडे यांनी दिली.
स्थायी समितीने बुधवारी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पाहणी केली. यावेळी महापौर तावडे यांच्यासह सभागृह नेते गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर, आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे उपस्थित होते. मुंबईला होणाऱ्या पाणीपुरवठ्यापैकी ३४ टक्के पाणी चोरी, गळतीतून वाया जाते. त्याचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी दिले. टंचाईच्या पार्श्वभूमीवर जलतरण तलाव आणि क्लबसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यावर बंधन आणण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com