शाळा बस शुल्कासाठी १५ ऑक्टोबरपासून यूपीआय बंद

शाळा बस शुल्कासाठी १५ ऑक्टोबरपासून यूपीआय बंद
Published on: 

शाळा बस शुल्कासाठी
१५ ऑक्टोबरपासून यूपीआय बंद
धनादेश किंवा क्रेडिट कार्डद्वारे भरण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : दोन हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या यूपीआय व्यवहारांवर पेमेंट गेटवेकडून आकारण्यात येणाऱ्या व्यवहार शुल्कामुळे १५ ऑक्टोबरपासून स्कूल बसचे शुल्क यूपीआयद्वारे स्वीकारले जाणार नसल्याचे शालेय बस व्यवस्थापनाने पालकांना कळविले आहे. बस शुल्क दोन हजार रुपयांपेक्षा अधिक असल्याने सहा महिन्यांचे शुल्क यूपीआयच्या माध्यमातून स्वीकारणे शाळेसाठी आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नसल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.
स्कूल बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग म्हणाले की, पालकांनी बस शुल्क केवळ धनादेश किंवा क्रेडिट कार्डद्वारे भरावे, असे आवाहन शाळेने केले आहे. यूपीआय व्यवहारावर दोन हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या पेमेंटसाठी प्रति व्यवहार २०० रुपये शुल्क आकारले जात आहे. त्यामुळे शाळेवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे.

केंद्रीय अर्थमंत्र्यांना ई-मेल
या शुल्कातून स्कूल बस, पेट्रोलपंप आणि स्पेअर पार्ट्स विक्रेत्यांना सूट देण्यात यावी, अशी मागणी शाळा व्यवस्थापनाने केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे केली आहे. यासंदर्भात अर्थमंत्र्यांना ई-मेल तसेच ‘एक्स’च्या माध्यमातून निवेदन करण्यात आल्याचेही व्यवस्थापनाने सांगितले. यूपीआय व्यवहारावरील शुल्कातून सूट न मिळाल्यास शाळेला बस शुल्काची यूपीआयद्वारे होणारी वसुली कायमस्वरूपी बंद करावी लागेल, असा इशाराही व्यवस्थापनाने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com