मुंबईकरांना ‘हरित दिवाळी’ची भेट

मुंबईकरांना ‘हरित दिवाळी’ची भेट
Published on: 

मुंबईकरांना ‘हरित दिवाळी’ची भेट
एक लाख झाडांचे भाजपचे उद्दिष्ट

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ ः मुंबईतील गृहनिर्माण संस्था आणि खासगी इमारतींच्या परिसरात वृक्षलागवडीस प्रोत्साहन देऊन एक लाख नवीन झाडांचे उद्दिष्ट भाजपने निश्चित केले आहे. दिवाळीपूर्वी मुंबईकरांना ‘हरित दिवाळी’ची भेट देण्याचा भाजपचा संकल्प आहे.
मुंबई शहरातील वाढते नागरीकरण, विविध पायाभूत सुविधा व विकास प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी गृहनिर्माण संस्था तसेच खासगी इमारतींच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवडीस प्रोत्साहन देण्यात यावे, अशी मागणी सभागृह नेते आणि वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य गणेश खणकर यांनी केली आहे. याबाबत नुकत्याच झालेल्या झालेल्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या सभेत खणकर यांनी हा मुद्दा उपस्थित केला तसेच पत्राद्वारेदेखील पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे मागणी केली आहे. मुंबईमध्ये नवीन वृक्षलागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर मोकळ्या जागा उपलब्ध नसल्याने उपलब्ध खासगी जागांचा प्रभावी वापर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. मुंबई शहरात सुमारे ४५ हजार गृहनिर्माण संस्था आणि सुमारे १५ हजार खासगी इमारती आहेत. या प्रत्येक गृहनिर्माण संस्था व इमारतीच्या परिसरात किमान एक ते दोन झाडे लावण्यास प्रोत्साहन दिल्यास शहरात सुमारे एक लाख नवीन झाडांची लागवड करणे शक्य होईल, असे खणकर यांनी स्पष्ट केले आहे.
...
छाटणीसाठी सुविधा द्या!
अनेक गृहनिर्माण संस्था वृक्षलागवडीसाठी सकारात्मक असल्या तरी झाडांच्या धोकादायक किंवा अडथळा निर्माण करणाऱ्या फांद्यांची वेळोवेळी छाटणी करण्यासाठी त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. महापालिकेकडून वेळेत छाटणीची कार्यवाही न झाल्यास संस्थांना खासगी पातळीवर खर्च करावा लागतो. त्यामुळे वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाला अपेक्षित चालना मिळत नसल्याचेही गणेश खणकर यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com