मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक

मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक
Published on: 

मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक
पश्चिम मार्गावर रात्रकालीन ब्लॉक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : उपनगरी रेल्वे मार्गांवरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी रविवारी (ता. ११) मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर माहीम ते मुंबई सेंट्रल अप आणि डाऊन जलद मार्गावर रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे.


मध्य रेल्वे
कुठे : माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर
कधी : सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या धीम्या गाड्या माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप व मुलुंड स्थानकांदरम्यान थांबतील. ठाणे येथून सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येईल. पुढे या लोकल मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीवदरम्यान मुलुंड व माटुंगा स्थानकांदरम्यान थांबून त्या धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.

हार्बर रेल्वे
कुठे : सीएसएमटी-चुनाभट्टी, वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर
कधी : सकाळी ११.१० ते दुपारी ४.४० वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी, वडाळा येथून वाशी, बेलापूर, पनवेलकरिता सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि वांद्रे, गोरेगाव येथून सीएसएमटीसाठीची सेवा रद्द राहणार आहे, तर पनवेल, बेलापूर, वाशी येथून सीएसएमटीकरिता सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव, वांद्रे येथून सीएसएमटी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवाही बंद राहील. ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (फलाट क्र. ८) दरम्यान विशेष सेवा २० मिनिटांच्या वारंवारतेने चालवल्या जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com