कामगारांना घरे मिळवून देऊ तेव्हाच लढा संपेल

कामगारांना घरे मिळवून देऊ तेव्हाच लढा संपेल
Published on: 

कामगारांना घरे मिळवून देऊ तेव्हाच लढा संपेल!
गिरणी कामगार संघर्ष समितीच्या विशेष सभेत निर्धार

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : ‘‘गिरणी कामगारांना हक्काची घरे मिळावीत, म्हणून कामगार नेते दत्ता इसवलकर यांनी सुरू केलेला लढा आजही सुरूच आहे. गिरणी कामगार संघर्ष समिती सातत्याने पाठपुरावा करीत असून, पात्र सर्व कामगारांना घरे मिळेपर्यंत लढा सुरूच राहील,’’ असा निर्धार संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रवीण घाग यांनी व्यक्त केला
गिरणी कामगार संघर्ष समितीच्या स्थापनेला ३७ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त परळ येथील कार्यालयात शुक्रवारी (ता. ९) विशेष सभा घेण्यात आली. या वेळी प्रवीण घाग म्हणाले, ‘‘इसवलकर यांनी सर्वांना बरोबर घेऊन नेटाने संघर्ष केला म्हणूनच गिरण्यांच्या जागेवर घराचा अधिकार मिळाला आहे. गिरण्यांच्या जमिनीवरील घरांपासून ‘एमएमआरडीए’च्या घरांपर्यंत आम्ही संघर्ष केला म्हणूनच आज गिरणगावात संघर्षाची दारे उघडी आहेत.’’ पुढे त्यांनी सांगितले, ‘‘मुंबईत कायद्याने घरे मिळाली, त्यानंतर मुंबईबाहेर कोणगाव, भिवंडी, पनवेल येथे एमएमआरडीएच्या माध्यमातून संघर्षातून घरे मिळवली. त्यानंतर एकही घर मिळाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच शासनाच्या १५ मार्च २०२४च्या शासन निर्णयानुसार शेलू येथील प्रकल्पाला संघटनेने पसंती दिली असून, तो लवकर कार्यान्वित करावा तसेच डीसीआरप्रमाणे मिळणाऱ्या जमिनी ताब्यात घेऊन गिरण्यांच्या जागेवर घरबांधणी सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली. या वेळी समितीचे सचिव प्रवीण येरूनकर, सहसचिव प्रकाश गोलतकर, बबन राणे, प्रकाश नाईक, अमोल धस, दीपाली थूल, गीता साळुंखे, गजानन सावंत आदी उपस्थित होते.

सरकार मुंबईत घरे देण्यास असमर्थ
सरकार मुंबईत जागेअभावी घरे देण्यास असमर्थ आहे, ठोस निर्णय घेत नाही. ज्यांना लढा समजला नाही ते तथाकथित आरोप करीत आहेत. कामगारांकडून मुंबईत घर देतो म्हणून पैसे उकळले जात आहेत. मेलेल्याच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्यांना माफ करणार नाही, अशा संतप्त प्रतिक्रिया कामगारांनी व्यक्त केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com