

‘बीएड’ची तिसरी यादी जाहीर
मुंबई, ता. १० : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी बॅचलर ऑफ एज्युकेशन (बीएड) अभ्यासक्रमाची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेची तिसरी निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. या फेरीत एकूण २६,१८७ जागा उपलब्ध होत्या, ज्यापैकी २३,८८७ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे या तिसऱ्या फेरीसाठी एकूण ४१,९९८ विद्यार्थ्यांनी प्रवेशाचा पसंतीक्रम नोंदवला होता.
राज्यात बीएड अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेशासाठी ६५ हजार ५३४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी विद्यार्थ्यांना दिलेल्या मुदतीत ४१ हजार ९९८ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरले होते. त्यामुळे याच विद्यार्थ्यांचा विचार तिसऱ्या कॅप फेरीच्या यादीसाठी करण्यात आला. तिसऱ्या फेरीच्या वाटपासाठी राज्यात ४७७ बीएड महाविद्यालयांत २६ हजार १८७ जागा उपलब्ध होत्या, त्यापैकी २३ हजार ८८७ विद्यार्थ्यांना तिसऱ्या फेरीत विविध पसंतीक्रमांच्या महाविद्यालयांमध्ये प्रवेशाची संधी उपलब्ध झाली आहे. यापूर्वी झालेल्या प्रवेशात पहिल्या फेरीत ७,३८३ आणि दुसऱ्या फेरीत २,४२५ विद्यार्थ्यांनी बीएड महाविद्यालयांत प्रवेश घेतला आहे. ज्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या फेरीमध्ये महाविद्यालय मिळाले आहे, त्या विद्यार्थ्यांनी १३ ऑक्टोबरपर्यंत मिळालेल्या महाविद्यालयामध्ये प्रत्यक्ष हजर राहून आवश्यक ती कागदपत्रे सादर करून व शुल्क भरून प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. त्यानंतर १४ ऑक्टोबरला रिक्त जागांची माहिती सादर केली जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.