

खाद्यतेलाच्या साठ्यांवर एफडीएचा छापा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : खाद्यतेलाच्या साठवणुकीपासून पॅकिंगपर्यंतच्या प्रक्रियेत अन्नसुरक्षा नियमांचे पालन होत आहे की नाही, याबाबत तपासणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे विभागात व्यापक मोहीम हाती घेतली आहे. पुणे, सांगली, सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांतील २५ आस्थापनांची तपासणी करीत प्रशासनाने एक कोटी २८ लाख ७३ हजार रुपये किमतीचे एकूण ७४ हजार ६१२ किलो खाद्यतेल जप्त केले.
या मोहिमेत उत्पादन आणि विक्री प्रक्रियेतील विविध त्रुटी समोर आल्या असून, जप्त तेलाच्या गुणवत्तेबाबतचा अंतिम निष्कर्ष प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. एफडीएच्या पथकांनी केलेल्या तपासणीत काही आस्थापनांमध्ये प्रयोगशाळेची व्यवस्था नसणे, केमिस्ट उपलब्ध नसणे आणि खरेदी-विक्री तसेच उत्पादनाच्या नोंदी व्यवस्थित न ठेवणे अशा त्रुटी आढळल्या. काही ठिकाणी वापरलेल्या टिनचा पुन्हा वापर करून खाद्यतेलाचे पॅकिंग केले जात असल्याचेही निदर्शनास आले. याशिवाय लेबलवरील माहितीतील त्रुटी आणि वैध परवान्याशिवाय व्यवसाय सुरू असल्याचे प्रकारही तपासणीत समोर आले. या कारवाईत पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक खाद्यतेल जप्त करण्यात आले. जिल्हानिहाय जप्त साठ्याचे चित्र पुढीलप्रमाणे आहे. पुण्यात ३४ हजार ४८१ किलो, कोल्हापुरात १८ हजार १५६ किलो, सोलापूरमध्ये १३ हजार ४९० किलो, साताऱ्यात पाच हजार ९४८ किलो आणि सांगलीत दोन हजार ५३६ किलो तेल जप्त केले.
...
अहवालानंतर पुढील निर्णय
जप्त करण्यात आलेल्या खाद्यतेलाचे नमुने प्रयोगशाळेत तपासले जाणार आहेत. अहवालात नियमांचे उल्लंघन सिद्ध झाल्यास संबंधित आस्थापनांविरोधात पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.