

मुंबई, ता. १३ : देशभरातील ट्रकचालकांना कमाईतील पैशांची बचत कशी करावी, योग्य ठिकाणी गुंतवणूक कशी करावी आणि भविष्यासाठी आर्थिक नियोजन कसे करावे, याबाबत धडे दिले जाणार आहेत. यासाठी ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट वेल्फेअर असोसिएशन (एआयटीडब्ल्यूए) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया (एनएसई) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे.
‘सेबी’चे पूर्णवेळ सदस्य संदीप प्रधान, ‘एनएसई’चे कार्यकारी संचालक संजय शोरी आणि मुख्य नियामक अधिकारी पीयूष चौरसिया यांच्या उपस्थितीत हा करार झाला. ‘एआयटीडब्ल्यूए’चे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक गोयल, सरचिटणीस अभिषेक गुप्ता आणि महिला विभागाच्या अध्यक्षा रीमा जोगानी या वेळी उपस्थित होते.
या करारानुसार ‘एनएसई’कडून ट्रकचालकांना पैशांचे नियोजन आणि गुंतवणुकीबाबत माहिती दिली जाणार आहे. ही माहिती एआयटीडब्ल्यूए कार्यशाळा आणि जनजागृती कार्यक्रमांच्या माध्यमातून चालकांपर्यंत पोहोचवणार आहे.
चालकांना मार्गदर्शन
नियमित बचत कशी करावी, बचतीचा पैसा कसा वाढवावा, गुंतवणूक करताना कोणती काळजी घ्यावी आणि निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी आर्थिक तयारी कशी करावी, याबाबत चालकांना मार्गदर्शन केले जाईल. तसेच कमी वेळेत जास्त परतावा देण्याचे प्रलोभन दाखविणाऱ्या बनावट गुंतवणूक योजना आणि आर्थिक फसवणूक कशी ओळखावी, याबाबची माहितीही दिली जाणार आहे.
खर्चात बचत महत्त्वाची
ट्रकचालकांचे उत्पन्न अनेकदा नियमित नसते. त्यामुळे अचानक येणारा खर्च, मुलांचे शिक्षण, कुटुंबाच्या गरजा आणि निवृत्तीनंतरच्या खर्चासाठी आधीपासून बचत करणे महत्त्वाचे ठरते. चालकांना याबाबत सोप्या पद्धतीने माहिती देणे, हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे ‘एआयटीडब्ल्यूए’ने म्हटले आहे.
मुंबई : एआयटीडब्ल्यूए-एनएसई यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.