

पालिका रुग्णालयांत एचएमआयएसची प्रभावी अंमलबजावणी
केईएम रुग्णालयात आढावा बैठक; आरोग्यसेवा गतिमान आणि पारदर्शक करण्यावर भर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमधील आरोग्यसेवा अधिक सुलभ, गतिमान आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने रुग्णालय व्यवस्थापन माहिती प्रणालीच्या (एचएमआयएस) प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात सोमवारी परळ येथील केईएम रुग्णालयात आढावा बैठक पार पडली.
मुंबई महापालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत एचएमआयएसच्या ऑनलाइन माहिती फलकाच्या कार्यपद्धतीसह विविध तांत्रिक आणि प्रशासकीय बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. महापालिकेच्या रुग्णालयांमधील दैनंदिन कामकाजाचे प्रभावी व्यवस्थापन, आरोग्यविषयक माहितीचे सुसूत्रीकरण आणि रुग्णांना वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी या प्रणालीच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. ऑनलाइन माहिती फलकाच्या माध्यमातून रुग्णालयीन कामकाज अधिक कार्यक्षम करण्यासह आरोग्यसेवांमध्ये पारदर्शकता वाढविण्याबाबतही चर्चा झाली.
या बैठकीला वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. शैलेश मोहिते, केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हरीश पाठक, मुख्य वैद्यकीय अधीक्षक चंद्रकांत पवार, मुख्य वैद्यकीय अधिकारी संतोष गायकवाड उपस्थित होते. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून रुग्णांना अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी या वेळी माध्यमांशी बोलताना सांगितले.
शासकीय कामकाजात सुसूत्रता
महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून रुग्णालयीन सेवा अधिक कार्यक्षम करणे, प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता आणणे आणि रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे, हा या बैठकीचा प्रमुख उद्देश होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.