

कसारा ब्लॉकचा लोकलसह
एक्स्प्रेस गाड्यांनाही फटका
१४ ते १६ ऑक्टोबरदरम्यान सेवा बंद
मुंबई, ता. १२ : आसनगाव-कसारा तिसऱ्या रेल्वे मार्गिका आणि कसारा यार्डच्या विस्तारीकरणासाठी सुरू असलेल्या ब्लॉकचा फटका लोकलसह मेल-एक्स्प्रेस गाड्यांनाही बसणार आहे. १४ ते १६ ऑक्टोबरदरम्यान आसनगाव-कसारा लोकल सेवा बंद राहणार असून, हावडा दुरांतोच्या दोन फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल, काहींचे मार्गवळण आणि नियमन करण्यात येणार आहे.
१४ ऑक्टोबरला दुपारी ३.३५ ते रात्री ८.३५, १५ ऑक्टोबरला दुपारी ३.३५ ते सायंकाळी ७.३५, तर १६ ऑक्टोबरला पहाटे ३ ते सकाळी ६ आणि दुपारी ३.३५ ते सायंकाळी ७.३५ या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे. कसारा-खर्डी आणि उंबरमाळी-कसारादरम्यान अप मार्गावर हा ब्लॉक असेल. त्यामुळे या कालावधीत आसनगाव-कसारा लोकल सेवा बंद राहील.
हावडा दुरांतोच्या फेऱ्या रद्द
१३ ऑक्टोबरला सुटणारी १२२६२ हावडा-सीएसएमटी दुरांतो आणि १४ ऑक्टोबरला सुटणारी १२२६१ सीएसएमटी-हावडा दुरांतो एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. १५ ऑक्टोबरला सीएसएमटी-हावडा दुरांतो सायंकाळी ५.१५ ऐवजी १६ ऑक्टोबरला मध्यरात्री १२.२० वाजता सुटेल.
अनेक गाड्यांच्या वेळेत बदल
१४ ऑक्टोबरला लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटणारी गोरखपूर एक्स्प्रेस सायंकाळी ५.५०, सीतापूर एक्स्प्रेस ५.३५ आणि धनबाद एक्स्प्रेस ६.०५ वाजता सुटेल. १५ ऑक्टोबरला गोरखपूर, राणी कमलापती आणि छपरा एक्स्प्रेस अनुक्रमे सायंकाळी ५.३५, ५.५० आणि ६.०५ वाजता सुटतील. कामायनी एक्स्प्रेस १४ आणि १५ ऑक्टोबरला सायंकाळी ५.०५, राजगीर एक्स्प्रेस ५.२०, तर सीएसएमटी-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस ५.१५ वाजता सुटेल.
पाच गाड्यांचे मार्गवळण
सीएसएमटी-गोरखपूर अंत्योदय, दादर-बलिया, सीएसएमटी-जबलपूर गरीब रथ, दादर-गोरखपूर आणि सीएसएमटी-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस कल्याण-कर्जत-पुणे-मनमाडमार्गे वळवण्यात येतील. सेवाग्राम एक्स्प्रेस १४ आणि १५ ऑक्टोबरला या मार्गाने धावेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.