

‘दुसरी संधी’ देण्याची साहिलची विनंती!
आयटीआयप्रकरणी पोलिसाचा दावा; संचालकांसह ४०हून अधिक जणांचे जबाब
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे (वय २२) याने परीक्षेत कॉपी करताना पकडले गेल्यानंतर संस्थेकडे लेखी माफी मागत आपल्याला ‘दुसरी संधी’ देण्याची विनंती केली होती, अशी माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे. वाकोडे याच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडून सुरू असून, आतापर्यंत ४०हून अधिक जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत.
आयआयटी मुंबईमध्ये बीटेकच्या द्वितीय वर्षात शिकणारा साहिल वाकोडे १८ सप्टेंबरला सायंकाळी वसतिगृहातील खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. त्याच दिवशी मध्यसत्र परीक्षेदरम्यान मोबाईल फोनच्या माध्यमातून ‘चॅटजीपीटी’चा वापर केल्याच्या आरोपावरून त्याला पकडण्यात आले होते. त्यानंतर त्याने संस्थेकडे लेखी माफीपत्र सादर केल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणात गुन्हे शाखेने आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. शिरीष केदारे यांच्यासह प्रा. सूर्यनारायण दुल्ला यांचाही जबाब नोंदविला आहे. वाकोडे याच्या पालकांनी प्रा. दुल्ला यांच्यावर छळ आणि जातीय भेदभावाचे आरोप केले आहेत. या आरोपांच्या अनुषंगानेही पोलिसांकडून तपास केला जात आहे. विद्यार्थ्याच्या मृत्यूमागील नेमक्या परिस्थितीचा शोध घेण्यासाठी त्याचे सहकारी विद्यार्थी, प्राध्यापक आणि संस्थेशी संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदविले जात आहेत. आतापर्यंत ४०हून अधिक जणांची चौकशी करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.
...
साहिलला न्याय मिळावा यासाठी आम्ही गेले १२ दिवस उपोषण करत आहोत, मात्र पोलिसांकडून आम्हाला चौकशी सुरू असल्याचे एकच उत्तर मिळते. दुसरीकडे साहिलने माफी मागितली ते सांगून बदनामी केली जात आहे.
- रवींद्र वाकोडे, साहिल वाकोडेचे वडील
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.