

ऑक्टोबर हीटमुळे आपत्कालीन ब्लॉक
मध्य रेल्वेच्या प्रवाशांना त्रास
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : मुंबईत ऑक्टोबर हीटचा तडाखा वाढत असतानाच रेल्वे रुळांच्या प्रसरणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तापमान वाढीमुळे रुळांचे प्रसरण होण्याची शक्यता लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मंगळवारी घाटकोपर आणि कोपर ते डोंबिवलीदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर आपत्कालीन ब्लॉक घेतले. त्यामुळे लोकल १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत होत्या. दुपारच्या वेळी प्रवाशांची संख्या तुलनेने कमी असतानाही लोकलमधील गर्दीमुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला.
घाटकोपर येथे दुपारी १२.४५ ते १.१५ या वेळेत डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात आला. त्यानंतर कोपर ते डोंबिवलीदरम्यान दुपारी १.३० ते १.४५ या वेळेत रेल्वे वाहतूक थांबविण्यात आली. रुळांची तपासणी आणि आवश्यक देखभाल-दुरुस्तीसाठी हे ब्लॉक घेण्यात आले. ऑक्टोबर महिन्यात तापमान वाढल्याने लोखंडी रेल्वे रुळांचे प्रसरण होऊ शकते. त्यामुळे रुळांवर अतिरिक्त ताण निर्माण होण्याची शक्यता असते. रेल्वे वाहतुकीची सुरक्षितता राखण्यासाठी रुळांची स्थिती तपासून आवश्यक देखभाल-दुरुस्ती केली जाते. यासाठी काही काळ वाहतूक थांबवून ब्लॉक घ्यावे लागतात.
...
प्रवाशांची गैरसोय
दुपारच्या वेळी प्रवाशांची गर्दी तुलनेने कमी असते. मात्र, लोकल १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत असल्याने स्थानकांवर प्रवाशांची प्रतीक्षा वाढली. परिणामी कमी गर्दीच्या वेळेतही लोकलमध्ये गर्दी झाली. त्यामुळे ऑक्टोबर हीटच्या झळांसोबतच प्रवाशांना विलंब आणि गर्दीचा त्रास सहन करावा लागला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.