पालिकेत स्वदेशी उत्पादनांची पर्वणी

पालिकेत स्वदेशी उत्पादनांची पर्वणी
Published on: 

मुंबई, ता. १४ : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने आणि महापालिकेच्या सहकार्याने पालिका मुख्यालयातील उपहारगृहात खादी व ग्रामोद्योग उत्पादनांच्या विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घा‌टन मंगळवारी (ता. १३) पालिकेचे सभागृह नेते गणेश खणकर आणि खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती (राज्यमंत्री दर्जा) रवींद्र साठे यांच्या हस्ते पार पडले. प्रदर्शन गुरुवारी (ता. १५)पर्यंत नागरिक व कर्मचाऱ्यांसाठी खुले राहणार आहे.

​प्रदर्शनात खादीचे शर्ट, कुर्ते, जॅकेट, हातमागाच्या साड्या, शुद्ध मध, साबण, सौंदर्य प्रसाधने, कोल्हापुरी चप्पल, हाताने बनवलेले पारंपरिक दागिने तसेच महिला बचत गटांनी तयार केलेले विविध खाद्यपदार्थ विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील स्थानिक कारागीर, लघुउद्योजक आणि पारंपरिक व्यावसायिकांना थेट ग्राहकांशी जोडून हक्काची बाजारपेठ मिळवून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

​उद्घाटनप्रसंगी खादी व ग्रामोद्योग मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण राऊत, सहमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार डांगर आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी नित्यानंद पाटील यांच्यासह पालिकेचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

किमान एक दिवस खादी वापरा
​स्थानिक कारागिरांना आणि ग्रामीण उद्योजकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महापालिकेने हा पुढाकार घेतला आहे. पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खादी वस्त्रांचा आणि ग्रामोद्योग उत्पादनांचा दैनंदिन वापर वाढवावा. कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून किमान एक दिवस खादीचे कपडे वापरावेत, असे आवाहन साठे यांनी केले.

मुंबई : खादी, ग्रामोद्योग प्रदर्शनाची रवींद्र साठे, गणेश खणकर यांनी पाहणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com