बेकायदा फलकबाजीवर पालिकेचा हातोडा

बेकायदा फलकबाजीवर पालिकेचा हातोडा
Published on: 

बेकायदा फलकबाजीवर पालिकेचा हातोडा
सहा दिवसांत २,२९१ पोस्टर्स हटवले, चौघांवर गुन्हे दाखल
​सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : सण-उत्सव, राजकीय घडामोडी आणि जाहिरातबाजीच्या नावाखाली मुंबईतील पदपथ, चौक व उड्डाणपुलांवर राजरोसपणे उभारल्या जाणाऱ्या अनधिकृत फलकबाजीवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. पालिकेच्या अनुज्ञप्ती विभागाने गेल्या सहा दिवसांत शहरात धडक मोहीम राबवून तब्बल २,२९१ बेकायदा बॅनर्स, बोर्ड्स, पोस्टर्स आणि झेंडे हटवले आहेत.
​याप्रकरणी केवळ फलक जप्त न करता संबंधितांवर थेट फौजदारी कारवाईचा पवित्रा घेण्यात आला असून, चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय पुढील कारवाईसाठी विविध पोलीस ठाण्यांना १३ तक्रारी पत्रे पाठवण्यात आली आहेत. ​

धार्मिक, सामाजिक फलकांचा भरणा अधिक
​पालिकेने जप्त केलेल्या फलकांमध्ये राजकीय आणि व्यावसायिक फलकांच्या तुलनेत धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांच्या फलकांची संख्या अधिक असल्याचे समोर आले आहे.
– ​बॅनर्स (१,४४२) : यामध्ये ७४८ धार्मिक व सामाजिक, ४३६ राजकीय आणि २५८ व्यावसायिक बॅनर्सवर हातोडा चालवण्यात आला.
– ​मोठे बोर्ड्स (६७३) : यामध्ये ३३६ धार्मिक-सामाजिक, २२६ राजकीय आणि १११ व्यावसायिक फलकांचा समावेश आहे.
– ​पोस्टर्स व झेंडे (१७६) : भिंतींवर चिकटवलेल्या १३३ पोस्टर्सपैकी ८१ पोस्टर्स सामाजिक व धार्मिक होती, तर ४३ झेंडेही जप्त करण्यात आले.

​तक्रारींचा ओघ वाढला
​मोहिमेच्या पहिल्याच दिवशी म्हणजे ८ ऑक्टोबर रोजी पालिकेने चार एफआयआर नोंदवून कठोर कारवाईची दिशा स्पष्ट केली होती. त्यानंतर १२ आणि १३ ऑक्टोबर रोजी अनुक्रमे २ आणि ११ पत्रे संबंधितांवर महाराष्ट्र मालमत्ता विद्रूपीकरण प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे नोंदवण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यांकडे पाठवण्यात आली आहेत. शहराचे विद्रूपीकरण कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही. पालिकेची पूर्वपरवानगी न घेता सार्वजनिक ठिकाणी किंवा पथदिव्यांच्या खांबांवर अनधिकृत फलक उभारणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहील, असे लायसेन्स विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com