मुंबईत सव्वाकोटीचे अमली पदार्थ जप्त

मुंबईत सव्वाकोटीचे अमली पदार्थ जप्त
Published on: 

मुंबईत सव्वाकोटीचे अमली पदार्थ जप्त
चौघा जणांना अटक

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी कक्षाने (एएनसी) शहरात तीन स्वतंत्र कारवाया करून एक कोटी ३२ लाख रुपयांहून अधिक किमतीचे अमली पदार्थ जप्त केले. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
एएनसीच्या वांद्रे पथकाने मंगळवारी एस. व्ही. रोडवरील जोगेश्वरी बस आगाराजवळून कासिफ फारुख शेखला (वय २३, रा. माझगाव) अटक केली. त्याच्याकडून एक किलो ११३ ग्रॅम चरस जप्त करण्यात आला. त्याची अवैध बाजारातील किंमत सुमारे एक कोटी ११ लाख रुपये आहे. घाटकोपर पथकाने मंगळवारी टिळकनगर येथील लोकमान्य टिळक टर्मिनसजवळ मनीषकुमार बैजनाथ चौधरीला (२५) अटक केली. पोलिसांनी सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड पुलाजवळ सापळा रचून त्याच्याकडून २२ किलोहून अधिक गांजा जप्त केला. त्याची किंमत ११ लाख रुपये आहे. प्राथमिक चौकशीत त्याने ओडिशातून गांजा आणल्याचे समोर आले. आझाद मैदान पथकाने बुधवारी (ता. १४) चेंबूर परिसरातून दोघांना अटक करून ३३१.४९ ग्रॅम मेफेड्रोन जप्त केले. त्याची किंमत सुमारे १० लाख रुपये आहे. तिन्ही प्रकरणांत अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार (एनडीपीएस) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जप्त केलेल्या अमली पदार्थांचा स्रोत आणि त्यामागील पुरवठा साखळी शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com