काँक्रीटीकरणाला पुन्हा वेग

काँक्रीटीकरणाला पुन्हा वेग
Published on: 

काँक्रीटीकरणाला पुन्हा वेग
पावसाळ्यानंतर रखडलेली कामे मार्गी लावण्याचे पालिकेचे नियोजन
मुंबई, ता. १६ ः पावसाळ्यामुळे रखडलेला रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची कामे रखडली होती, पावसाळा संपल्यामुळे शहर आणि उपनगरात काँक्रीटीकरणाच्या कामाला पुन्हा वेग देण्याचे नियोजन केले असल्याची माहिती पालिकेच्या रस्ते विभागाने दिली.
मुंबईत पावसाळ्यानंतर आता पुन्हा काँक्रीटीकरणाची कामे सुरू करून रखडलेली कामे मार्गी लावण्याचे नियोजन मुंबई महापालिका प्रशासनाने केले आहे, मात्र काही कंत्राटदारांकडून कामांना विलंब होत असल्याने प्रशासनासमोर मुदतीत प्रकल्प पूर्ण करण्याचे आव्हान आहे. पालिकेच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी ५,५२० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील रस्त्यांची कामे पूर्ण करण्यावर प्रशासनाचा भर आहे.
मुंबईतील २७५ किलोमीटर रस्त्यांवरील काँक्रीटीकरणाची कामे पावसाल्यामुळे थांबवली होती. या कामांची अंदाजित किंमत ३८० कोटी रुपये असून, आता या कामांसाठी नव्याने निविदा काढण्याचा प्रस्ताव प्रशासनाने पुढे आणला आहे. महापालिकेच्या दोन्ही टप्प्यांतील एकूण ५९० किलोमीटर रस्त्यांची कामे अपूर्ण होती.
दुय्यम अभियंता, सहाय्यक अभियंता यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील काँक्रीटीकरण कामांचे वेळापत्रक तयार करावे, असे आदेश रस्ते विभागाने दिले आहेत. कंत्राटदारांनीही एकावेळी अधिक ठिकाणी कामे हाती घेऊन ती वेगाने पूर्णत्वास न्यावीत, अशा सूचना देण्यात आल्याची माहिती रस्ते विभागाने दिली आहे.

काँक्रीटीकरणाची सद्यःस्थिती
हाती घेतलेले रस्ते - २७४.७५ किमी
काम अर्धवट राहिले रस्ते - ३१६.६३ किमी
एकूण अपूर्ण कामे - ५९०.१३८ किमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com