अवैध प्रवासी वाहतुकीवर एसटीची करडी नजर

अवैध प्रवासी वाहतुकीवर एसटीची करडी नजर
Published on: 

अवैध प्रवासी वाहतुकीवर एसटीची करडी नजर

बसस्थानकाच्या २०० मीटर परिसरात तपासणी

मुंबई, ता. १० (सकाळ वृत्तसेवा) : बसस्थानक परिसरातील वाहतूक कोंडी, प्रवाशांची गैरसोय आणि अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) कारवाईची मोहीम तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बसस्थानकाच्या २०० मीटर परिसरातील नो-पार्किंग क्षेत्रात वाहने उभी करून अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि एसटी महामंडळाच्या मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी डॉ. नारनवरे यांच्या निर्देशानुसार राज्यभर अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. सणासुदीच्या काळात खासगी वाहनांकडून बसस्थानक परिसरातून प्रवाशांची वाहतूक केली जात असल्याने दिवाळीत तपासणी अधिक कडक करण्यात येणार आहे.
बसस्थानकाच्या २०० मीटर परिसरात खासगी वाहने उभी करून प्रवाशांची वाहतूक केल्याने वाहतूक कोंडी होते. तसेच एसटी बसच्या आवागमनात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे नो-पार्किंग क्षेत्रात उभ्या असलेल्या वाहनांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.
अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, तसेच एसटीकडून उपलब्ध करून दिलेल्या वाहनांचा वापर केवळ कारवाईसाठीच करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. प्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या सर्व ५९ कार्यालयांना आवश्यक संसाधने उपलब्ध करून देण्यासाठीही एसटीने तातडीने कार्यवाही करावी, असे सांगण्यात आले आहे.
“बसस्थानक परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवणे, एसटी प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करणे आणि अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालणे, हा या मोहिमेचा उद्देश आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार असून, वाहनचालकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे,” असे एसटी महामंडळाच्या मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी प्रियांका नारनवरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com