

सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी
सेन्सेक्स ४१३ तर निफ्टीत १४८ अंशांनी वाढ
मुंबई, ता. १६ : आयटी, प्रसारमाध्यमे आणि धातूनिर्मिती कंपन्या यांच्या शेअरची खरेदी झाल्यामुळे आज भारतीय शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी अर्धा टक्क्यांपेक्षा जास्त वाढले. सेन्सेक्स ४१३.६६ अंशांनी, तर निफ्टी १४८.८० अंशांनी वाढला. आज शेअर बाजारांची सुरुवात चांगली झाली. व्यवहार सुरू झाल्यावर सेन्सेक्स ७४ हजारांच्या वरच उघडला आणि नंतर तो ७४,५०० च्या वर गेल्यानंतर पुन्हा त्याखाली आलाच नाही. दिवसअखेर सेन्सेक्स ७४,७२९.२७ अंशांवर, तर निफ्टी २३,१४६.१५ अंशावर स्थिरावला.
आज एफएमसीजी, ऑइल अँड गॅस आणि औषधनिर्मिती कंपन्या, ही क्षेत्रे तोटा दाखवीत होती, तर दुसरीकडे आयटी, धातूनिर्मिती, सरकारी बँका, पायाभूत सुविधा ही क्षेत्रे नफ्यात होती. मिडकॅप आणि स्मॉलकॅप क्षेत्रेही तोटा दाखवीत होती. आयटी कंपन्यांचे निकाल चांगले येत असल्यामुळे त्या शेअरची आज खरेदी झाली. त्यामुळे शेअर बाजार वाढला.
सेन्सेक्समध्ये आज टेक महिंद्र साडेआठ टक्के, तर टीसीएस साडेचार टक्के वाढला. इन्फोसिसदेखील साडेचार टक्के वाढला, तर एचसीएल टेक एक टक्का वाढला. त्याखेरीज एअरटेल, महिंद्र आणि महिंद्र या शेअरचे भाव दोन टक्क्यांपेक्षा जास्त वाढले. बजाज फायनान्स, एनटीपीसी, अल्ट्राटेक सिमेंट, मारुती या शेअरचे भावही वाढल, तर दुसरीकडे इंडिगो सव्वादोन टक्के घसरला. रिलायन्स इंडस्ट्रीज, एशियन पेंट या शेअरचे भाव एक टक्का घसरले. बीईएल, आयटीसी, लार्सन अँड टुब्रो, कोटक बँक या शेअरचे भावही घसरले.
कोट........
चांगले निकाल आणि व्यवस्थापनाचे उत्साहवर्धक मतप्रदर्शन यामुळे आयटी शेअरची खरेदी झाली, मात्र कच्च्या मालाच्या किंमतवाढीच्या चिंतेमुळे एफएमसीची क्षेत्र दडपणाखाली होते. शेअर बाजारातली तेजी टिकण्यासाठी आयटीप्रमाणेच अन्य कंपन्यांचे निकालही चांगले आले पाहिजेत आणि एकंदर मागणी वाढणे आवश्यक आहे.
- विनोद नायर, जिओजित इन्व्हेस्टमेंट्स.
Remarks :
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.