एमबीबीएस व बीडीएसच्या रिक्त जागांच्या प्रवेश फेरींचे सुधारित वेळापत्रक जाहीर

एमबीबीएस व बीडीएसच्या रिक्त जागांच्या प्रवेश फेरींचे सुधारित वेळापत्रक जाहीर
Published on: 

एमबीबीएस, बीडीएसच्या रिक्त जागांच्या प्रवेश फेरींचे सुधारित वेळापत्रक जाहीर
मुंबई, ता. १६ : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रवेशासाठी वैद्यकीय शिक्षणाच्या अंतर्गत असलेल्या वैद्यकीय एमबीबीएस व बीडीएस या अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या तीन प्रवेश फेऱ्या संपन्न झाल्या. केंद्रीभूत प्रवेश फेरी-३ नंतर शासकीय, महापालिका, शासन अनुदानित, खासगी विनाअनुदानित तसेच अल्पसंख्याक महाविद्यालयांतील एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमाच्या रिक्त जागांवरील प्रवेशासाठी केंद्रीय परिषदेकडून प्राप्त वेळापत्रकानुसार रिक्त जागांच्या ऑनलाइन प्रवेश फेरींचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, या रिक्त प्रवेशाच्या तीन फेऱ्या ऑनलाइन घेण्यात येणार आहेत.


स्ट्रे व्हॅकन्सी प्रवेश फेरी-१चे वेळापत्रक
एमबीबीएस व बीडीएस (ग्रुप ए)
तपशील दिनांक व वेळ
रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध करणे १६ ऑक्टोबर २०२६
ऑनलाइन पसंतीक्रम/प्राधान्यक्रम भरणे १७ ते १८ ऑक्टोबर रात्री ११.५९ पर्यंत
प्रवेश फेरी-१ चा निकाल १९ ऑक्टोबर
प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश निश्चित करणे. २० ते २१ ऑक्टोबर सायंकाळी ५.३० पर्यंत
प्रवेशित जागा रदृ करण्याचा अंतिम दिनांक २१ ऑक्टोबर सायंकाळी ५.३० पर्यंत

स्ट्रे व्हॅकन्सी प्रवेश फेरी-२ व ३चे वेळापत्रक व अद्ययावत माहितीसाठी महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळास www.mahacet.org भेट द्यावी असे आवाहन सीईटी सेलकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com