

मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेवर प्रवाशांना दिलासा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : उपनगरी रेल्वे मार्गावरील अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी (ता. १८) मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे ते कल्याण यादरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर, तसेच हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी यादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक घेण्यात येईल. यामुळे लोकल आणि मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे. दरम्यान, पश्चिम रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक नसेल.
मध्य रेल्वे
कुठे : ठाणे ते कल्याणदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर
कधी : सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत
परिणाम : या ब्लॉकदरम्यान ठाणे ते कल्याणदरम्यान अप दिशेकडील मेल-एक्स्प्रेस गाड्या अप जलद मार्गावर, तर डाऊन दिशेकडील गाड्या डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. त्यामुळे संबंधित गाड्या गंतव्यस्थानी १० ते १५ मिनिटे उशिराने पोहोचतील. अप दिशेकडील सोलापूर-वंदे भारत, पुणे-सिंहगड, डेक्कन क्वीन, प्रगती एक्स्प्रेस, मंगळुरू एक्स्प्रेस, राजगीर-जनता एक्स्प्रेस, काकीनाडा पोर्ट एक्स्प्रेस, बनारस सुपरफास्ट, हावडा-मुंबई मेल, हटिया एक्स्प्रेस, कोयंबतूर एक्स्प्रेस, नांदेड-राज्यराणी आणि चेन्नई सुपरफास्ट एक्स्प्रेस या गाड्यांवर परिणाम होईल. डाऊन दिशेकडील कोयना, गोदान, जयनगर आणि नेत्रावती एक्स्प्रेसचाही मार्ग बदलण्यात येईल.
---
हार्बर रेल्वे
कुठे : पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर
कधी : सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत पनवेल येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल, तसेच सीएसएमटी येथून बेलापूर ते पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल रद्द राहतील. पनवेल येथून ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल आणि ठाणे येथून पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकलही रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वाशी यादरम्यान विशेष लोकल चालवण्यात येतील. ठाणे ते वाशी आणि ठाणे ते नेरूळदरम्यान ट्रान्स हार्बर लोकल उपलब्ध असतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.