

तिसऱ्या फेरीनंतर एमबीबीएस,
बीडीएसच्या १,०३६ जागा रिक्त
मुंबई, ता. १७ : वैद्यकीय शिक्षणाअंतर्गत असलेल्या एमबीबीएस व बीडीएस पदवी अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या तिन्ही फेऱ्या संपल्या आहेत. या तिन्ही फेऱ्यांअखेर राज्यात एकूण ११ हजार ४३१ जागांपैकी १० हजार ३९५ जागांवर म्हणजे ९०.९३ % विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. यात एकूण १,०३६ जागा शिल्लक राहिल्या असून, या शिल्लक जागेसाठीच्या फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
राज्यात एमबीबीएस या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीअखेर एकूण आठ हजार ८१४ जागांपैकी आठ हजार २८८ म्हणजे ९४.०३ % विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले असून ५२६ जागा रिक्त आहेत. यामध्ये राज्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या पाच हजार ६५ जागा आहेत. यापैकी पाच हजार ४५ म्हणजे ९९.६० % विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले असून २० जागा रिक्त आहेत. तर खासगी वैद्यकीय महाविद्यालयांत एमबीबीएसच्या ३७४९ जागा आहेत. यापैकी ३,२४३ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले असून, ५०६ जागा रिक्त आहेत. एकूण ८६.५० % प्रवेश झाले आहेत.
बीडीएसचे ८०.५१ % प्रवेश
राज्यात बीडीएस या अभ्यासक्रम प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीअखेर एकूण दोन हजार ६१७ जागांपैकी दोन हजार १०७ म्हणजे ८०.५१ % विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले असून ५१० जागा रिक्त आहेत. यामध्ये राज्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत बीडीएसच्या ३१७ जागा आहेत. यापैकी २९१ म्हणजे ९१.७९ % विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले असून २६ जागा रिक्त आहेत. तर खासगी वैद्यकीय महाविद्यालयात बीडीएसच्या २,३०० जागा आहेत. यापैकी १,८१६ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले असून ४८४ जागा रिक्त आहेत. एकूण ७८.९५ % प्रवेश झाले आहेत.
शिल्लक जागांसाठीच्या फेरीचे वेळापत्रक जाहीर
एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमांच्या रिक्त जागांवरील प्रवेशासाठी केंद्रीय परिषदेकडून प्राप्त वेळापत्रकानुसार रिक्त जागांच्या ऑनलाइन प्रवेश फेरींचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, या रिक्त प्रवेशाच्या तीन फेऱ्या ऑनलाइन घेण्यात येणार आहेत. १७ ते १८ ऑक्टोबरला रात्री ११.५९ पर्यंत ऑनलाइन पद्धतीने पसंतीक्रम/प्राधान्यक्रम भरण्याची प्रक्रिया असेल. प्रवेश फेरी तीनमध्ये भरलेले पसंतीक्रम रद्द होतील. ऑनलाइन स्ट्रे व्हॅकन्सी प्रवेश फेरीसाठी नव्याने पसंतीक्रम भरणे अनिवार्य असेल.
स्ट्रे व्हॅकन्सी प्रवेश फेरी २ व ३ चे वेळापत्रक आणि अद्ययावत माहितीसाठी महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळास www.mahacet.org भेट द्यावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.