ध्वनिप्रदूषण प्रकरणी आवाज फाउंडेशनची याचिका मंजूर; २१ ऑक्टोबरला सुनावणी

ध्वनिप्रदूषण प्रकरणी आवाज फाउंडेशनची याचिका मंजूर; २१ ऑक्टोबरला सुनावणी
Published on: 

ध्वनिप्रदूषणप्रकरणी आवाज फाउंडेशनची
याचिका मंजूर; २१ ऑक्टोबरला सुनावणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : ध्वनिप्रदूषणासंदर्भातील मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुमोटो जनहित याचिकेत हस्तक्षेप करण्यासाठी आवाज फाउंडेशनने दाखल केलेला अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे. गुरुवारी (ता. १५) झालेल्या सुनावणीत न्यायालयाने हा अर्ज मंजूर करून संबंधित प्रकरणाची पुढील सुनावणी २१ ऑक्टोबरला निश्चित केली आहे. त्यामुळे ध्वनिप्रदूषण नियंत्रणासाठी न्यायालयाने दिलेल्या आदेशांच्या अंमलबजावणीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत एम. सेठना यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. ध्वनिप्रदूषणासंदर्भातील सुमोटो जनहित याचिका न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखालील दुसऱ्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात आली आहे. त्यामुळे आवाज फाउंडेशनच्या हस्तक्षेप अर्जांसह संबंधित प्रकरणे २१ ऑक्टोबरला याच खंडपीठासमोर सुनावणीसाठी ठेवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.

आवाज फाउंडेशनने न्यायालयाच्या आदेशांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत आहे की नाही, यावर लक्ष ठेवण्याची भूमिका घेतली आहे. ध्वनिप्रदूषण नियंत्रणासाठी दिलेल्या निर्देशांची जमिनीवरील अंमलबजावणी आणि त्यातील त्रुटी याबाबत न्यायालयाला वेळोवेळी अवगत करण्यात येणार असल्याचे फाउंडेशनने स्पष्ट केले आहे. ध्वनिप्रदूषणाच्या प्रश्नावर न्यायालयीन देखरेखीखाली सुरू असलेल्या प्रक्रियेत आवाज फाउंडेशनच्या सहभागामुळे या विषयावरील पुढील सुनावणीकडे लक्ष लागले आहे.
.......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com