

दृष्टिहीन नऊ महिलांचा ‘नवदुर्गा’ पुरस्काराने सन्मान
कांदिवलीत अधारिका फाउंडेशनतर्फे फॅन्सी ड्रेस गरबा उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : शिक्षण, क्रीडा, कला, संशोधन आणि समाजसेवेच्या क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या नऊ दृष्टिहीन महिलांचा कांदिवली येथे ‘नवदुर्गा पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. अधारिका फाउंडेशनतर्फे आयोजित फॅन्सी ड्रेस गरबा कार्यक्रमात हा पुरस्कार सोहळा झाला.
पुरस्कारप्राप्त महिलांमध्ये तृप्ती सुनील वजरानी, नेहा नलीन पावसकर, पायल श्रीगोपाल भट्टाड, कोमल पाटील, परिमळा विष्णू भट, सिद्धी तोरस्कर, डॉ. उर्वी जंगम, रुजूल गोयथळे आणि उम्मेहानी बागसरावाला यांचा समावेश आहे. विविध क्षेत्रांत काम करताना या महिलांनी मिळविलेले यश आणि दृष्टिहीन व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी केलेले प्रयत्न या निमित्ताने समोर आले.
तृप्ती वजरानी यांनी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ आणि गोलबॉल स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. नेहा पावसकर यांनी क्षितिधर शिखर सर करून विश्वविक्रम नोंदविल्याची माहिती आयोजकांनी दिली. पायल भट्टाड या पीएच.डी. संशोधक असू,न बँकिंग क्षेत्रात कार्यरत आहेत. कोमल पाटील यांनी मल्लखांब आणि टँडम सायकलिंगमध्ये कामगिरी केली आहे.
पुरस्कार सोहळ्यासोबत आयोजित गरबा कार्यक्रमात दृष्टिहीन सहभागी महिला आणि इतर सहभागी उत्साहाने सहभागी झाले. फॅन्सी ड्रेस, संगीत आणि नृत्याच्या माध्यमातून त्यांनी आपली कलात्मकता सादर केली.
स्नेहांकित हेल्पलाइन
दृष्टिहीन विद्यार्थ्यांना मदत मिळावी, यासाठी परिमळा भट यांनी ‘स्नेहांकित हेल्पलाइन’ सुरू केली. सिद्धी तोरस्कर नृत्य आणि नाट्यकलेच्या माध्यमातून विशेष गरजा असलेल्या मुलांसोबत काम करतात. डॉ. उर्वी जंगम यांनी जर्मन स्टडीजमध्ये पीएच.डी. मिळवली आहे. रुजूल गोयथळे यांनी दहावीच्या परीक्षेत ९०.४० टक्के गुण मिळविले, तर उम्मेहानी बागसरावाला यांच्या ‘पर्ल ऑफ विजन'' या उपक्रमातून दृष्टिहीन विद्यार्थ्यांना शिक्षण, तंत्रज्ञान आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे काम केले जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.