

झोपडपट्टीवासीयांना पक्की घरे मिळवून देण्यासाठी प्रयत्न : गोयल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : ‘झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला पक्के घर मिळावे आणि त्यांना सन्मानाने व सुरक्षितपणे जीवन जगता यावे, यासाठी प्रयत्न करण्यात येतील,’ असे आश्वासन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री तथा उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांनी दिले. कांदिवली पूर्व येथे नवरात्रोत्सवानिमित्त त्यांनी स्थानिक रहिवाशांशी संवाद साधला.
परिसरातील रहिवाशांनी संघटित व्हावे आणि त्यांना त्याच ठिकाणी पक्की घरे उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू करावी, अशा सूचना गोयल यांनी संबंधित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्या. या कामासाठी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
‘‘प्रत्येक कुटुंबाला पक्क्या घरात सन्मानाने आणि सुरक्षिततेने राहण्याची संधी मिळाली पाहिजे. रहिवाशांनी एकत्र येऊन यासाठी प्रयत्न करावेत, प्रत्येक गरजू कुटुंबाला सुरक्षित घर उपलब्ध करून देण्यासाठी आपण काम करू,’’ असे गोयल म्हणाले. या वेळी गोयल यांनी देशाच्या विकासातील तरुणांच्या भूमिकेवरही भर दिला. विकसित भारताच्या निर्मितीत युवा शक्ती महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशाला उज्ज्वल भविष्याकडे नेण्यासाठी तरुणांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.