

म्हाडाच्या अभियंता सेवाप्रवेश नियमांसाठी समिती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : म्हाडाच्या आस्थापनेवरील कार्यकारी अभियंता (स्थापत्य) या संवर्गाच्या सेवाप्रवेश नियमांमध्ये सुधारणा करण्याबाबत शिफारशी करण्यासाठी राज्य शासनाने विशेष समिती गठित केली आहे. या समितीला तीन महिन्यांच्या मुदतीत स्वयं-स्पष्ट अहवाल शासनास सादर करावा लागणार आहे.
म्हाडातील कार्यकारी अभियंता (स्थापत्य) संवर्गाचे सेवाप्रवेश नियम १९९७ च्या अधिसूचना अन्वये अधिसूचित करण्यात आले आहेत. या नियमांबाबत म्हाडाच्या आस्थापनेवरील सरळ सेवेने नियुक्त आणि पदोन्नतीने नियुक्त अशा दोन्ही उपअभियंत्यांच्या मागण्या होत्या. त्यासाठी म्हाडाने यापूर्वी तटस्थ समिती गठित केली होती. त्या समितीच्या शिफारशी आणि प्राधिकरणाच्या ठरावानुसार म्हाडाने १३ ऑक्टोबर २०२५ रोजी शासनाला सुधारणा प्रस्ताव सादर केला होता. त्यावर अपर मुख्य सचिव (गृहनिर्माण) यांच्या अध्यक्षतेखाली ३१ जानेवारी २०२४ रोजी झालेल्या बैठकीत शासन स्तरावर समिती गठित करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार गठित करण्यात आलेल्या या समितीचे अध्यक्ष गृहनिर्माण विभागाचे सहसचिव असणार आहेत. या समितीला सार्वजनिक बांधकाम आणि जलसंपदा विभागातील कार्यकारी अभियंता (स्थापत्य) संवर्गाच्या सेवाप्रवेश नियमांशी तुलना करून म्हाडाच्या नियमात सुधारणा आवश्यक आहे का, याबाबत शिफारस करावी लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.