खर्डी-कसारा मार्गावरील तिसरा मार्गिका सुरू

खर्डी-कसारा मार्गावरील तिसरा मार्गिका सुरू
Published on: 

खर्डी-कसारा मार्गावरील तिसरी मार्गिका सुरू
मध्य रेल्वेची ११७ किमी प्रतितास वेगाची चाचणी यशस्वी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २० : मध्य रेल्वेने खर्डी-कसारा यादरम्यानच्या १३.५३ किलोमीटर लांबीची तिसरी मार्गिका रविवारी (ता. १८) यशस्वीपणे कार्यान्वित केली आहे. कल्याण-कसारा तिसऱ्या रेल्वे मार्ग प्रकल्पातील हा महत्त्वाचा टप्पा आहे. नव्या मार्गावर ११७ किलोमीटर प्रतितास वेगाने चाचणी घेण्यात आली असून, या मार्गावर ताशी १०० किलोमीटर वेगाने रेल्वे वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे.

मध्य रेल्वेने या कामासाठी १७ आणि १८ ऑक्टोबरदरम्यान १२ तासांचा विशेष ब्लॉक घेतला. या काळात मुख्य मार्गाची जोडणी आणि कसारा यार्डच्या पुनर्रचनेची कामे पूर्ण करण्यात आली. रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी १७ आणि १८ ऑक्टोबर रोजी नव्या मार्गाची पाहणी केली. त्यानंतर मार्गाचे कार्यान्वयन करण्यात आले. पाहणीदरम्यान बांधकामाचा दर्जा, रुळांची स्थिती आणि सुरक्षा व्यवस्थेचे त्यांनी कौतुक केले. या मार्गाच्या उभारणीत डोंगराळ आणि आव्हानात्मक भूप्रदेशातून विद्युतीकृत रेल्वे मार्ग टाकण्यात आला. याशिवाय पुलांचे बळकटीकरण आणि विस्तार, मोठ्या प्रमाणावर मातीकाम, आधुनिक सिग्नल यंत्रणा व विद्युतीकरणाची कामे करण्यात आली. खर्डी आणि कसारा येथील रेल्वे यार्डांमध्येही सुधारणा करण्यात आल्या.

गर्दी कमी होण्यास मदत
कल्याण-कसारा तिसऱ्या रेल्वे मार्गाचा संपूर्ण प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील रेल्वे वाहतुकीची क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. लोकल आणि मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या परिचालनावरील ताण कमी होऊन वेळापत्रकाचे पालन सुधारण्याची अपेक्षा आहे. तसेच प्रवासी आणि मालगाड्यांची वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होईल, असे मध्य रेल्वेने प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com