रॅपिडोच्या दुचाकी टॅक्सीवर प्रश्नचिन्ह

रॅपिडोच्या दुचाकी टॅक्सीवर प्रश्नचिन्ह
Published on: 

रॅपिडोच्या दुचाकी टॅक्सीवर प्रश्नचिन्ह

चालकांच्या माहितीअभावी परवाना रखडला

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण
नियम-निकष पूर्ण न झाल्याने रॅपिडोला बाईकटॅक्सीसाठी परवाना नाही

चालकांची माहिती वडाळा आरटीओला दिली नाही

मुंबई, ता. २० (सकाळ वृत्तसेवा) : अभिनेता टायगर श्रॉफशी संबंधित गोळीबार प्रकरणात रॅपिडो चालकाचे नाव समोर आल्यानंतर ॲप-आधारित दुचाकी टॅक्सी सेवेच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. रॅपिडो कंपनीने दुचाकी टॅक्सी परवान्यासाठी वडाळा प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) अर्ज केला असला, तरी आवश्यक नियम आणि निकषांची पूर्तता न केल्याने कंपनीला अद्याप परवाना मिळालेला नाही. विशेष म्हणजे, कंपनीने चालकांची आवश्यक माहितीही आरटीओला सादर केलेली नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे परवाना नसताना मुंबईत सुरू असलेल्या दुचाकी टॅक्सी सेवेच्या नियमनाचा प्रश्न उपस्थित होत आहे.

राज्यातील प्रमुख शहरांमध्ये ॲप-आधारित दुचाकी टॅक्सीचा वापर वाढत असताना या सेवांना कायदेशीर चौकटीत आणण्याचे आव्हान परिवहन विभागासमोर आहे. मुंबई, नागपूरसह विविध शहरांमध्ये ॲग्रिगेटर कंपन्यांनी परवान्यासाठी संबंधित आरटीओ कार्यालयांकडे अर्ज केले आहेत. रॅपिडोनेही ऑगस्टमध्ये वडाळा आरटीओकडे अर्ज दाखल केला होता. मात्र, अर्जाच्या छाननीदरम्यान आवश्यक कागदपत्रे आणि नियमांच्या पूर्ततेबाबत त्रुटी आढळल्याने परवान्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही.

चालकांची माहितीच सादर नाही

दुचाकी टॅक्सी सेवा चालविणाऱ्या कंपन्यांना शासनाच्या धोरणानुसार विविध अटींचे पालन करणे आवश्यक आहे. चालकांचा वैध वाहनचालक परवाना, पोलीस पडताळणी, आवश्यक प्रशिक्षण, वाहनांची व्यावसायिक नोंदणी आणि योग्यता प्रमाणपत्र यांचा त्यात समावेश आहे. प्रवाशांसाठी अपघात विमा, जीपीएस ट्रॅकिंग, आपत्कालीन सुविधा आणि तक्रार निवारण यंत्रणाही आवश्यक आहेत. तसेच, भाडेदर, माहितीची देवाणघेवाण आणि महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी निर्धारित उपाययोजनांचे पालन करणे बंधनकारक आहे.

वडाळा आरटीओच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी पल्लवी कोठावदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रॅपिडोने परवान्यासाठी अर्ज केला आहे; मात्र नियम आणि निकषांची पूर्तता केलेली नाही. चालकांची माहितीही कंपनीकडून सादर करण्यात आलेली नसल्याने परवाना देण्यात आलेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com