

पुढील सहा महिन्यांत नोकरभरती वाढणार
ई-कॉमर्स, पर्यटन क्षेत्रांत सर्वाधिक पसंती
मुंबई, ता. २१ : भारतातील आघाडीची स्टाफिंग संस्था टीमलीज सर्व्हिसेसच्या अहवालानुसार, ऑक्टोबर २०२६ ते मार्च २०२७ या सहा महिन्यांत देशातील नोकरभरतीत ५.४ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. वाहननिर्मिती, पर्यटन आणि बँकिंग या क्षेत्रांत नोकरभरती वाढेल, असा अंदाज अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
बंगळूर, हैदराबाद आणि पुणे या शहरांमध्ये सर्वाधिक नोकरभरती होण्याची अपेक्षा आहे. यापूर्वीच्या सहा महिन्यांत नोकरभरती वाढीचा दर ४.७ टक्के होता. सध्या ६० टक्के कंपन्या मनुष्यबळ वाढवण्याच्या नियोजनात आहेत. तर २४ टक्के कंपन्या कर्मचारीसंख्या स्थिर ठेवणार असून, १६ टक्के कंपन्यांना कर्मचारी कपात करावी लागण्याची शक्यता आहे. देशातील २३ उद्योग क्षेत्रांतील १,२३९ नियोक्त्यांशी चर्चा करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
आर्थिक परिस्थिती, व्यवसायातील वाढ, पुनर्रचना आणि तांत्रिक प्रगती या घटकांचा नोकरभरतीवर परिणाम होत आहे. ई-कॉमर्स आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्टअपमध्ये नोकरभरतीची सर्वाधिक १२.६ टक्के शक्यता आहे. त्यानंतर पर्यटन क्षेत्रात १२.३ टक्के, किरकोळ विक्री क्षेत्रात १०.३ टक्के, वाहननिर्मिती क्षेत्रात १०.१ टक्के, इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात ९.७ टक्के आणि बँकिंग क्षेत्रात ९.२ टक्के नोकरभरती वाढण्याचा अंदाज आहे.
मोठ्या कंपन्यांपैकी ६६ टक्के कंपन्या मनुष्यबळ वाढवण्याच्या तयारीत आहेत. मध्यम उद्योगांमध्ये हे प्रमाण ५९ टक्के, तर स्टार्टअप आणि लहान व्यवसायांमध्ये ५३ टक्के आहे. माहिती तंत्रज्ञान, विक्री व पणन आणि अभियांत्रिकी विभागांतील रिक्त पदे भरण्यासाठी सरासरी ३५ ते ४५ दिवस लागतात, असे टीमलीज सर्व्हिसेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष बालसुब्रमण्यम ए. यांनी सांगितले.
.....
बंगळूरमधील ६८ टक्के कंपन्यात भरती
शहरनिहाय विचार करता, बंगळूरमधील ६८ टक्के कंपन्या नोकरभरती करणार आहेत. हैदराबादमध्ये हे प्रमाण ६१ टक्के, तर पुण्यात ६० टक्के आहे; मात्र, विस्तारासाठी आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ सहज उपलब्ध होत नसल्याने मनुष्यबळ वाढवू इच्छिणाऱ्या ७२ टक्के नियोक्त्यांना अडचणी येण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.