महालक्ष्मीतील दुकानाला भीषण आग

महालक्ष्मीतील दुकानाला भीषण आग
Published on: 

महालक्ष्मीतील दुकानाला भीषण आग
चार कामगार होरपळले; एकाची प्रकृती गंभीर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : महालक्ष्मी येथील भुलाभाई देसाई मार्गावरील ब्रीच कँडी रुग्णालयाजवळ असलेल्या अमर सन्स या दुकानाला मंगळवारी (ता. २०) सकाळी भीषण आग लागली. या आगीत चौघे जण भाजले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी एक जण ८० टक्के भाजला आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे सहा तासांच्या प्रयत्नांनंतर दुपारी २ वाजता आगीवर नियंत्रण मिळवले.

मुंबई अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला मंगळवारी सकाळी ८ वाजून १ मिनिटांनी आगीची माहिती मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे काम सुरू केले. आगीची तीव्रता लक्षात घेऊन अग्निशमन दलाने प्रथम स्तरावरील आग म्हणून नोंद केली. या दुर्घटनेत तौफिक शादिल कुरेशी (वय २०) हा ८० टक्के भाजला आहे. जाहिद अबिदुल्ला कुरेशी (२०) आणि कमाल जलालुद्दीन शाह (४७) हे प्रत्येकी ४० टक्के, तर लालचंद रामलखन गौतम (४०) हा १० टक्के भाजला आहे. या चौघांवर उपचार सुरू आहेत. आगीमध्ये दुकानातील विद्युत वाहिन्या, विद्युत उपकरणे आणि मीटर बॉक्ससह तयार कपडे, क्रॉकरी, कृत्रिम दागिने, कापडी पिशव्या, लिनेन, स्टेशनरी, कार्यालयीन कागदपत्रे, बिल बुक, संगणकाचे साहित्य, लाकडी फर्निचर, स्टीलचे रॅक, काचेच्या वस्तू, दिव्यांची उपकरणे, भेटवस्तू, विविध प्रकारचे कापड आणि वातानुकूलन यंत्रणेचे नुकसान झाले. दुकानाच्या तळमजल्यावर आग लागली होती. ही इमारत तळमजला अधिक दोन मजल्यांची आहे. या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com