

कोकण रेल्वेचे नवे वेळापत्रक आजपासून!
वंदे भारत, तेजस, कोकणकन्याच्या वेळांत बदल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : कोकण रेल्वेचे पावसाळ्यानंतरचे नवे वेळापत्रक उद्यापासून (ता. २१) लागू होणार आहे. वंदे भारत, तेजस, कोकणकन्या, जनशताब्दी, मांडवीसह अनेक प्रमुख गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबईहून कोकण आणि गोव्याच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सुधारित वेळापत्रक तपासून घ्यावेत, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. नव्या वेळापत्रकातील बदलांची नोंद तिकीट आरक्षण प्रणालीत (पीआरएस) करण्यात येणार असून, स्थानकांवरील सूचना फलक आणि उद्घोषणांद्वारेही प्रवाशांना माहिती दिली जाईल. नव्या वेळापत्रकात एकूण ५७ गाड्यांच्या सेवांचा समावेश करण्यात आला आहे.
---
प्रमुख गाड्यांच्या सुधारित वेळा
१. ट्रेन क्रमांक २२२२९/३० - सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस सीएसएमटीहून सकाळी ५.२५ वाजता सुटून दुपारी १.१० वाजता मडगावला पोहोचेल. परतीच्या प्रवासात मडगावहून दुपारी २.४० वाजता सुटून रात्री १०.२५ वाजता सीएसएमटीला पोहोचेल.
२. ट्रेन क्रमांक २२११९/२० - सीएसएमटी-मडगाव तेजस एक्स्प्रेस सीएसएमटीहून सकाळी ५.५० वाजता सुटून दुपारी ३ वाजता मडगावला पोहोचेल. ही गाडी सोमवार आणि गुरुवार वगळता आठवड्यातून पाच दिवस धावेल.
३. ट्रेन क्रमांक २०१११/१२ - सीएसएमटी-मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेस सीएसएमटीहून रात्री ११.०२ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ९.४५ वाजता मडगावला पोहोचेल. ही गाडी दररोज धावेल.
४. ट्रेन क्रमांक १२०५१/५२ - सीएसएमटी-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस सीएएमटीहून सकाळी ५.१० वाजता सुटून दुपारी २.३० वाजता मडगावला पोहोचेल. ही गाडी दररोज धावेल.
५. ट्रेन क्रमांक १०१०३/०४ - सीएसएमटी-मडगाव मांडवी एक्स्प्रेस सीएसएमटीहून सकाळी ७.१० वाजता सुटून सायंकाळी ७.३० वाजता मडगावला पोहोचेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.