

विदर्भ एक्स्प्रेसमधून चाेरीला
गेलेला मुद्देमाल हस्तगत
चोरटा पश्चिम बंगालमधून जेरबंद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : विदर्भ एक्स्प्रेसमध्ये प्रवासात झोपलेल्या प्रवाशाचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असलेली २६ लाख ७५ हजार रुपयांची बॅग चोरून नेणाऱ्या आरोपीला सीएसएमटी रेल्वे पोलिसांनी पश्चिम बंगालमधून अटक केली. जहीर जमाल शेख (वय २८) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह २६ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. न्यायालयाच्या आदेशानंतर हा मुद्देमाल तक्रारदाराला परत करण्यात आला.
अभिषेक शिकरवार हे १७ जानेवारी २०२६ रोजी विदर्भ एक्स्प्रेसने नागपूरहून मुंबईला येत होते. नाशिक रेल्वे स्थानकावर पहाटे २.४२ वाजता गाडी पोहोचल्यानंतर त्यांनी सॅकबॅग जवळ ठेवून झोप घेतली. सकाळी ७ च्या सुमारास गाडी सीएसएमटी स्थानकातील फलाट क्रमांक १२ वर पोहोचल्यानंतर त्यांना बॅग चोरीला गेल्याचे लक्षात आले. बॅगमध्ये सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम होती. याप्रकरणी सीएसएमटी रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी कटारे आणि सहायक पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण युनिटने समांतर तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपीचा माग काढून पोलिसांनी जहीर याला पश्चिम बंगालमधून अटक केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.