‘अनमोल बिश्नोईच्या ताब्यासाठीच्या प्रयत्नांचा सविस्तर अहवाल द्या!’

‘अनमोल बिश्नोईच्या ताब्यासाठीच्या प्रयत्नांचा सविस्तर अहवाल द्या!’
Published on: 

‘अनमोल बिश्नोईच्या ताब्यासाठीच्या प्रयत्नांचा सविस्तर अहवाल द्या!’
सिद्दिकी हत्याप्रकरणी पोलिसांना आदेश

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकीच्या हत्येप्रकरणातील आरोपी अनमोल बिश्नोईचा ताबा मिळवण्यासाठी केलेल्या कायदेशीर प्रयत्नांचा सविस्तर अहवाल सादर करा, असे आदेश बुधवारी (ता. २१) विशेष मकोका न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले.
विशेष मकोका न्यायालयाचे न्यायाधीश महेश जाधव यांनी १० जुलैला अनमोलचा ताबा मिळवण्यासाठी कायदेशीर मार्गांचा अवलंबण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. त्यानंतर ५ ऑगस्टला न्यायालयाने अनमोलला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर न केल्याबद्दल तपास अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. सरकारी वकील महेश मुळे यांनी तपास अधिकारी अनुपस्थित असून आपणही आजारी असल्याचे सांगत मुदत मागितली. मात्र, सिद्दिकी कुटुंबीयांचे वकील प्रदीप घरत आणि त्रिवणकुमार कर्नानी यांनी सरकारी पक्ष जाणीवपूर्वक खटल्याला विलंब करत असून न्यायालयाच्या आधीच्या आदेशांचे पालन करीत नसल्याचा आरोपही केला. या याचिकेवर २८ ऑक्टोबरला सुनावणी ठेवली आहे.
...
सध्या तिहार तुरुंगात
अनमोलला राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अटक केली असून तो सध्या दिल्लीतील तिहार तुरुंगात आहे. केंद्र सरकारच्या ५ डिसेंबर २०२५ च्या आदेशानुसार त्याच्या दिल्लीबाहेरील हालचालींवर एक वर्षासाठी किंवा खटला पूर्ण होईपर्यंत निर्बंध आहेत. दरम्यान, १२ ऑक्टोबर २०२४ रोजी वांद्रे येथे बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल या प्रकरणात आरोपी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com