रेल्वे परिसरात अस्वच्छतेवर कारवाई

रेल्वे परिसरात अस्वच्छतेवर कारवाई
Published on: 

मुंबई, ता. २२ : रेल्वे परिसरात कचरा टाकणाऱ्यांविरोधात पश्चिम रेल्वेने कारवाई केली आहे. विशेष स्वच्छता मोहिमेदरम्यान अस्वच्छता करणाऱ्या सुमारे ५० जणांकडून ४८ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला, तर अन्य ८२ जणांचे समुपदेशन करण्यात आले. या मोहिमेत २,५०० किलोहून अधिक कचरा गोळा करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली.

मुंबई सेंट्रल, वसई रोड, बोरिवली, गोरेगाव, विरार, अंधेरी, वापी, सुरत आणि अमळनेर यांसह विविध स्थानकांवर ही मोहीम राबवण्यात आली. स्थानके आणि रेल्वे वसाहतींमधील सुमारे ४० ठिकाणांवरील अनधिकृत पोस्टर, फलक आणि स्टिकर्स हटवण्यात आले. तसेच १२० ठिकाणांवरील गुटखा आणि पानाच्या पिचकाऱ्यांचे डाग स्वच्छ करण्यात आले. वलसाड आणि अमळनेर येथील रेल्वे वसाहतींमध्येही स्वच्छता करण्यात आली.

गाड्यांची स्वच्छता
मुंबई सेंट्रल येथील ईएमयू कारशेड, नंदुरबार येथील कॅरेज अँड वॅगन डेपो आणि अन्य देखभाल केंद्रांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या डब्यांची अंतर्गत आणि बाह्य स्वच्छता करण्यात आली.

खाद्यपदार्थांच्या स्टॉलची तपासणी
प्रवाशांना सुरक्षित खाद्यपदार्थ आणि स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, ग्रँट रोड, वलसाड, उधना, सुरत आणि वापी स्थानकांवरील खाद्यपदार्थांच्या स्टॉलची तपासणी करण्यात आली. गाड्यांमधील पॅन्ट्री कारची पाहणी करून खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. खाद्यपदार्थ हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांना वैयक्तिक स्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com