

मुंबई, ता. २२ : वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांपासून ते डॉक्टर आणि प्राध्यापकांपर्यंत सर्वांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न गंभीर होत असून, त्यासाठी केवळ समुपदेशन किंवा एखाद्या कार्यक्रमापुरते प्रयत्न मर्यादित न ठेवता संस्थात्मक पातळीवर मानसिक आरोग्याची संस्कृती विकसित करण्याची गरज आहे, असे मत जी. एस. वैद्यकीय महाविद्यालय आणि केईएम रुग्णालयाच्या वतीने आयोजित कार्यशाळेत ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे यांनी व्यक्त केले.
वैद्यकीय व्यावसायिकांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न राष्ट्रीय पातळीवर चिंतेचा विषय बनला आहे. वैद्यकीय पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटना समोर येत आहेत. वैद्यकीय शिक्षण घेताना अभ्यासाचा ताण, दीर्घ कामाचे तास, रुग्णांचे दुःख आणि त्यातून निर्माण होणारा मानसिक ताण याचा परिणाम विद्यार्थ्यांसह डॉक्टरांवरही होत असल्याचे सांगण्यात आले.
या पार्श्वभूमीवर ‘माइंडफुलनेस’ म्हणजेच सजगतेने विचार करण्याची आणि वर्तमान क्षणाशी जोडून राहण्याची पद्धत उपयुक्त ठरू शकते, मात्र हा केवळ एक-दोन तासांचा कार्यक्रम न ठेवता त्याचा वैद्यकीय शिक्षणाच्या प्रक्रियेत समावेश करण्याची गरज आहे. त्यासाठी शिक्षकांचे प्रशिक्षण घेऊन त्यांना मार्गदर्शक म्हणून तयार करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
२५ शिक्षकांना चार दिवसांचे प्रशिक्षण
सुमारे २५ शिक्षकांना चार दिवसांचे प्रशिक्षण देऊन त्यांना पुढे इतर विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन करता येईल, अशी व्यवस्था उभारण्याचा विचार आहे. यामुळे हा उपक्रम केवळ औपचारिक न राहता महाविद्यालयीन संस्कृतीचा भाग होऊ शकतो.
उपक्रमाचा सर्वांना फायदा
मानसिक आरोग्य हा अभ्यासक्रमाचा आणि संस्थात्मक संस्कृतीचा भाग झाला, तर वैद्यकीय विद्यार्थ्यांपासून प्राध्यापकांपर्यंत सर्वांना त्याचा फायदा होईल. हा उपक्रम राष्ट्रीय पातळीवर राबविण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाशीही चर्चा करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
मुंबई : कार्यशाळेत ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे यांनी मार्गदर्शन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.