दिवाळीत फटाक्यांवर जनजागृतीचा ''बार''; •एमपीसीबीसोबत बैठक;

दिवाळीत फटाक्यांवर जनजागृतीचा ''बार'';  •एमपीसीबीसोबत बैठक;
Published on: 

प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना
महापालिकेची जनजागृतीसाठी एमपीसीबीसह सेलिब्रिटींची मदत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : दिवाळीत फटाक्यांमुळे होणारे वायू आणि ध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठी महापालिका जनजागृती मोहीम राबविणार आहे. फटाके फोडण्याचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासोबत (एमपीसीबी) बैठक घेण्यात आली. विविध प्रसारमाध्यमे आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मुंबईकरांमध्ये जागृती केली जाणार आहे. आवश्यकतेनुसार मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटींची मदतही घेतली जाईल, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दिवाळीत मोठ्या प्रमाणावर फटाके फोडले जातात. त्यामुळे वातावरणातील प्रदूषणात भर पडते. विशेषतः दिवाळीचा सण थंडीच्या काळात येत असल्याने हवेची गुणवत्ता आधीच खालावण्याची शक्यता असते. त्यात फटाक्यांमधून बाहेर पडणारा धूर आणि सूक्ष्म कण यांची भर पडल्याने मुंबईतील हवेच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. तसेच फटाक्यांच्या मोठ्या आवाजामुळे ध्वनिप्रदूषणाची समस्याही निर्माण होते. त्यामुळे नागरिकांनी फटाक्यांचा वापर मर्यादित ठेवावा, यासाठी महापालिका प्रयत्नशील असल्याचे ढाकणे यांनी स्पष्ट केले. ध्वनिप्रदूषणाच्या समस्येची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने आठवडाभरापूर्वी महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. त्यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या निर्देशांची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे. ध्वनिप्रदूषण रोखण्याबरोबरच वायुप्रदूषण कमी करण्यासाठीही विविध उपाययोजना आणि जनजागृतीवर भर दिला जाणार असल्याचे ढाकणे यांनी सांगितले.
-----
महापालिकेचे आवाहन
दिवाळीचा आनंद साजरा करताना पर्यावरणाचे संरक्षण आणि नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःहून फटाक्यांचा वापर कमी करून प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
.........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com