

मंगळसूत्र चोरणाऱ्या दोन महिला जेरबंद
दिवा स्थानकात कारवाई; ७.५५ लाखांची पाच मंगळसूत्रे जप्त
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : दिवा रेल्वे स्थानकात लोकलमध्ये महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरणाऱ्या दोन महिलांना ठाणे लोहमार्ग पोलिसांनी पकडले. साध्या वेशातील महिला कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. अटकेतील महिलांकडून चोरीची पाच सोन्याची मंगळसूत्रे जप्त करण्यात आली असून, त्यांची एकूण किंमत सात लाख ५५ हजार रुपये आहे. या कारवाईमुळे ठाणे आणि कळवा लोहमार्ग पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या चोरीच्या तीन गुन्ह्यांची उकल झाली आहे.
२१ ऑक्टोबरला सकाळी दिवा स्थानकातील फलाट क्रमांक दोनवर सीएसएमटीच्या दिशेने जाणारी धीमी लोकल आली. महिला डब्यात चढण्यासाठी प्रवाशांची गर्दी झाली असताना दोन महिलांनी दिवा पूर्व येथे राहणाऱ्या कविता कटके (वय ४०) यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानकावर साध्या वेशात तैनात असलेल्या महिला पोलिस कर्मचारी भारती फाळके आणि अवंतिका सुवे यांनी तत्परता दाखवत दोघींनाही घटनास्थळी पकडले.
पुण्यातील महिलांना अटक
मेघिता आरव काळे आणि अनू बबन काळे अशी अटक केलेल्या महिलांची नावे आहेत. दोघीही पुण्यातील येरवडा परिसरातील रहिवासी आहेत. कटके यांच्या तक्रारीवरून ठाणे लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.