मुंबई-नागपूरदरम्यान उद्या मध्यरात्री विशेष गाडी मध्य रेल्वेच्या विविध मार्गांवरील विशेष गाड्यांना नोव्हेंबरअखेरपर्यंत मुदतवाढ

मुंबई-नागपूरदरम्यान उद्या मध्यरात्री विशेष गाडी  मध्य रेल्वेच्या विविध मार्गांवरील विशेष गाड्यांना नोव्हेंबरअखेरपर्यंत मुदतवाढ
Published on: 

मुंबई-नागपूरदरम्यान उद्या मध्यरात्री विशेष गाडी
मध्य रेल्वेच्या विविध मार्गांवरील विशेष गाड्यांना नोव्हेंबरअखेरपर्यंत मुदतवाढ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : सणासुदीच्या काळातील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते नागपूरदरम्यान एकमार्गी विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी २५ ऑक्टोबरला मध्यरात्री १२.२५ वाजता सीएसएमटी येथून सुटून त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता नागपूरला पोहोचेल. याशिवाय, मध्य रेल्वेने विविध मार्गांवरील विशेष गाड्यांच्या सेवांना नोव्हेंबरअखेरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
गाडी क्रमांक ०११५७ सीएसएमटी-नागपूर एकमार्गी विशेष गाडी दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या स्थानकांवर थांबेल. या गाडीला वातानुकूलित द्वितीय श्रेणीचे चार, वातानुकूलित तृतीय श्रेणीचे आठ, शयनयान श्रेणीचे सहा आणि सामान्य द्वितीय श्रेणीचे दोन डबे असतील. तसेच, गार्ड ब्रेक व्हॅनची सुविधाही असेल.

लातूर, कोल्हापूर मार्गांवरील गाड्यांना मुदतवाढ
मध्य रेल्वेने गाडी क्रमांक ०११०५ सीएसएमटी-लातूर, ०११०६ लातूर-सीएसएमटी, ०१२०१ नागपूर-हडपसर, ०१४१७ सीएसएमटी-कोल्हापूर आणि ०१४१८ कोल्हापूर-सीएसएमटी या विशेष गाड्यांच्या सेवांना २६ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

पुणे, नागपूर, अमरावती मार्गांचाही समावेश
गाडी क्रमांक ०१४०३ पुणे-अमरावतीची सेवा २४ नोव्हेंबरपर्यंत, तर ०१४०४ अमरावती-पुणेची सेवा २५ नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. गाडी क्रमांक ०१२०२ नागपूर-हडपसरची सेवा २६ नोव्हेंबरपर्यंत, तर ०१२०९ नागपूर-हडपसर आणि ०२१३९ सीएसएमटी-नागपूर या गाड्यांच्या सेवांना २८ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे, गाडी क्रमांक ०१२१० हडपसर-नागपूर आणि ०२१४० नागपूर-सीएसएमटी या गाड्या २९ नोव्हेंबरपर्यंत धावतील. गाडी क्रमांक ०१४५१ कोल्हापूर-कलबुर्गी आणि ०१४५२ कलबुर्गी-कोल्हापूर या गाड्यांच्या सेवांना ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com