धारावीत एका दिवसात नमुना सातचे २४ अर्ज

धारावीत एका दिवसात नमुना सातचे २४ अर्ज
Published on: 

धारावीत एका दिवसात नमुना सातचे २४ अर्ज

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत (एसआयआर) प्रारूप मतदार यादीवर हरकती नोंदवताना निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक अर्ज दाखल केल्याप्रकरणी धारावीत एका व्यक्तीविरोधात शनिवारी (ता. २४) तक्रार दाखल करण्यात आली आहे. १७८-धारावी विधानसभा मतदारसंघात गिरिधारी स्वामीनाथ जयस्वाल यांनी एकाच दिवशी नमुना सातचे २४ अर्ज दाखल केल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी जयस्वालविरोधात धारावी पोलिस ठाण्यात लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० च्या कलम ३१ अन्वये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

प्रारूप मतदार यादीवरील हरकतींची प्रक्रिया नियमांनुसार पार पडावी, यासाठी भारत निवडणूक आयोग आणि महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार नमुना सातचे जास्तीत जास्त १० अर्ज प्रतिदिन दाखल करण्याची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे, मात्र १७८-धारावी विधानसभा मतदारसंघात जयस्वाल यांनी एकाच दिवशी २४ अर्ज दाखल केल्याचे आढळून आले. त्यामुळे निर्धारित मर्यादेचे उल्लंघन झाल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. निवडणूक प्रक्रियेदरम्यान नमुना सातमध्ये जाणूनबुजून चुकीची माहिती किंवा खोटी घोषणा केल्याचे आढळल्यास संबंधित व्यक्तीविरोधात लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० च्या कलम ३१ अन्वये कारवाई करण्याची तरतूद आहे. त्यानुसार, जयस्वाल यांनी निर्धारित नियमांचे उल्लंघन करून खोटी व चुकीची माहिती देत अर्ज दाखल केल्याच्या आरोपावरून धारावी पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. मतदार याद्यांच्या पुनरीक्षण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी आणि हरकतींची छाननी नियमानुसार होण्यासाठी निवडणूक यंत्रणेकडून आवश्यक कार्यवाही केली जात आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
.............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com