नवरात्रोत्सवात १२२ कोटींचा मुद्देमाल जप्त

नवरात्रोत्सवात १२२ कोटींचा मुद्देमाल जप्त
Published on: 

नवरात्रोत्सवात १२२ कोटींचा मुद्देमाल जप्त
एफडीएची राज्यभर कठोर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : अन्न व औषध प्रशासनाने नवरात्रोत्सवात राज्यभर विशेष तपासणी मोहिमेत भेसळयुक्त अन्नपदार्थ, प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूविरोधात धडक कारवाई केली. या कारवाईत सुमारे १२२ कोटी ७४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६८ आस्थापनांचे परवाने किंवा नोंदणी निलंबित करण्यात आली आहे. तसेच प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या प्रकरणांत २२ गुन्हे दाखल करून २० आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि अमरावती या सात विभागांत ही मोहीम राबविण्यात आली. अन्नपदार्थांची गुणवत्ता, संभाव्य भेसळ, चुकीचे वेष्टनावरील तपशील, अस्वच्छता आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन यांची तपासणी करण्यात आली. राज्यभरात निकृष्ट, संभाव्य भेसळयुक्त किंवा चुकीचे लेबल लावलेला सुमारे तीन लाख ७४ हजार ७६२ किलो अन्नसाठा आणि २८ हजार २१७ लिटर अन्नपदार्थ जप्त अथवा नष्ट करण्यात आले. या साठ्याची अंदाजित किंमत ११ कोटी ११ लाख रुपये आहे. या कारवाईत खाद्यतेल, मसाले, दुग्धजन्य पदार्थ, मिठाई, फरसाण, चहा, सुकामेवा आणि इतर खाद्यपदार्थांचा समावेश आहे. विल्हेवाटीसाठी पाठविण्यात आलेले, खराब किंवा नाकारलेले अन्नपदार्थ नष्ट न करता पुन्हा बाजारात विक्रीसाठी आणले जात असल्याच्या संशयावरून ठाणे आणि पुणे जिल्ह्यांत विशेष तपासणी करण्यात आली. या कारवाईत सहा हजार ३९२ किलो अन्नसाठा जप्त करण्यात आला. या साठ्याची अंदाजित किंमत ४८ लाख नऊ हजार रुपये असून, संबंधित प्रकरणांत पाच परवाने निलंबित करण्यात आले आहेत. या प्रकरणांमध्ये फौजदारी तक्रारीही दाखल करण्यात आल्या आहेत.
...
दोन शीतगृहांवर छापे
छत्रपती संभाजीनगर विभागात दोन शीतगृहांवर एकाच दिवशी कारवाई करून सुमारे एक लाख १७ हजार ४८० किलो अन्नसाठा जप्त करण्यात आला. या साठ्याची अंदाजित किंमत चार कोटी ११ लाख रुपये आहे. जप्त केलेल्या साठ्यात मिरचीपूड, मनुका, गूळ आणि पाश्चराइज्ड बटरचा समावेश होता. या कारवाईनंतर दोन्ही शीतगृहांचे परवाने निलंबित करण्यात आले.
...
६८ आस्थापनांना दणका
राज्यभरातील ६८ आस्थापनांचे परवाने किंवा नोंदणी निलंबित करण्यात आली. सात आस्थापनांना व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आले, तर चार आस्थापनांकडून अन्नसुरक्षा व मानके कायद्याच्या कलम ६९ अंतर्गत एकूण एक लाख ३० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com