इंडिगोच्या १२ आंतरराष्ट्रीय सेवा नवी मुंबईतून

इंडिगोच्या १२ आंतरराष्ट्रीय सेवा नवी मुंबईतून
Published on: 

इंडिगोच्या १२ आंतरराष्ट्रीय सेवा नवी मुंबईतून
फेब्रुवारी २०२७ पासून टप्प्याटप्प्याने स्थलांतर; १२ शहरांशी जोडणी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (सीएसएमआयए) इंडिगोच्या काही आंतरराष्ट्रीय विमानसेवा नवी मुंबई विमानतळावर (एनएमआयए) स्थलांतरित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. फेब्रुवारी २०२७ पासून नवी मुंबईतून आंतरराष्ट्रीय सेवा सुरू करण्याची योजना अंमलबजावणीच्या अंतिम टप्प्यात असल्याची घोषणा इंडिगो आणि अदाणी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडने (एएएचएल) रविवारी (ता. २५) केली.
या योजनेनुसार इंडिगो मुंबई विमानतळावरील १२ दैनंदिन आंतरराष्ट्रीय उड्डाणे टप्प्याटप्प्याने नवी मुंबई विमानतळावर हलविणार आहे. यामध्ये बहरीन, रियाध, दम्माम, जेद्दाह, मदिना, कुवेत, रास अल खैमाह, फुजैरा, मस्कत, ढाका आणि जकार्ता येथील सध्याच्या सेवांचा समावेश आहे. याशिवाय काठमांडूसाठी नवीन दैनंदिन सेवा सुरू केली जाणार आहे. त्यामुळे फेब्रुवारी ते जुलै २०२७ दरम्यान नवी मुंबईतून इंडिगोचे आंतरराष्ट्रीय जाळे १२ शहरांपर्यंत विस्तारेल.
आंतरराष्ट्रीय उड्डाणांना आवश्यक देशांतर्गत जोडणीही मुंबई विमानतळावरून नवी मुंबईत स्थलांतरित केली जाणार आहे. प्रवाशांना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवांदरम्यान सुलभ प्रवास करता यावा, यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करण्यात येणार असल्याचे एएएचएलने म्हटले आहे.
मुंबई विमानतळाच्या टर्मिनल-१च्या प्रस्तावित पुनर्विकासाच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत सेवांचेही पुनर्संतुलन केले जाणार आहे. अंतिम प्रकल्प समन्वय आणि आवश्यक कार्यान्वयन मंजुरी मिळाल्यानंतर विमानसेवांच्या स्थलांतराच्या निश्चित तारखा जाहीर करण्यात येतील, असे इंडिगो आणि एएएचएलने स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com