‘बाटू’ने साधली चौफेर प्रगती

‘बाटू’ने साधली चौफेर प्रगती
Published on: 

‘बाटू’ने साधली चौफेर प्रगती
मंत्री पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रमांचे उद्‍घाटन

मुंबई, ता. २६ : क्वांटम संगणना यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानापासून बांबू उद्योग, स्टार्टअप निर्मिती आणि जलसंधारणापर्यंत विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाने (बाटू) चौफेर प्रगती साधली आहे. आयबीएम क्वांटमच्या ‘क्विस्किट फॉल फेस्ट २०२६’ या जागतिक उपक्रमासाठी निवड झालेल्या जगभरातील १६० शैक्षणिक व संशोधन संस्थांमध्ये विद्यापीठाचा समावेश झाला आहे. यानिमित्ताने विद्यापीठात आयोजित तीन दिवसीय क्वांटम तंत्रज्ञान प्रशिक्षण, कार्यशाळा आणि हॅकॅथॉनचे उद्‍घाटन आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झाले.
२६ ते २८ ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या या उपक्रमात राज्यातील विविध शैक्षणिक संस्थांमधील सुमारे १५० विद्यार्थी आणि ५० प्राध्यापक सहभागी झाले आहेत. आयबीएम, आयसर आणि नॅसकॉम, पुणे येथील तज्ज्ञांकडून क्वांटम संगणन, क्वांटम प्रोग्रामिंग आणि त्याच्या व्यावहारिक उपयोगांचे प्रशिक्षण दिले जात आहे. ‘‘क्वांटम तंत्रज्ञान हे भविष्यातील अर्थव्यवस्था, संरक्षण, आरोग्य आणि संशोधनासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विद्यापीठाची निवड अभिमानास्पद आहे,’’ असे चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. महाराष्ट्र क्वांटम तंत्रज्ञान मिशनअंतर्गत विद्यापीठाला २.५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, त्यातून अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि प्राध्यापक प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. कुलगुरू प्रा. डॉ. रजनीश कामत यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानातील जागतिक संधी उपलब्ध करून देण्याचा विद्यापीठाचा निर्धार व्यक्त केला. ज्ञानातून संशोधन, संशोधनातून उद्योग आणि उद्योगातून रोजगारनिर्मिती हे विद्यापीठाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
...
मान्यवरांनी केली पाहणी
मान्यवरांनी विद्यापीठातील बांबू कौशल्य विकास व संशोधन केंद्र आणि इनक्युबेशन केंद्राची पाहणी केली. बांबूपासून विविध उत्पादने तयार करण्याचे प्रशिक्षण देऊन स्थानिक कारागिरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न येथे सुरू आहे. इनक्युबेशन केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कल्पनांना स्टार्टअप आणि उद्योगांचे स्वरूप देण्यासाठी मार्गदर्शन केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com