

मुंबई बँकेची निवडणूक पारदर्शक व्हावी!
धनंजय शिंदे ः यादीची छाननी करा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्राथमिक मतदार यादीची सर्वंकष, तांत्रिक आणि कायदेशीर छाननी करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस धनंजय शिंदे यांनी केली आहे. मुंबई बँकेची निवडणूक पारदर्शक, निष्पक्ष आणि कायदेशीर चौकटीत झाली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना धनंजय शिंदे पुढे म्हणाले, की मुंबई बँकेच्या निवडणुकीसाठी ठराव सादर करण्याची प्रक्रिया सुरू असताना, ८ ऑक्टोबर २०२६ला दुबार ठराव सादर केल्याच्या मुद्द्यावर त्यांनी आक्षेप नोंदविला होता. संबंधित ठरावांच्या मूळ प्रती, आवक नोंदी, सादरीकरणाची तारीख, संस्थेचे इतिवृत्त आणि अधिकृत प्रतिनिधीच्या नियुक्तीशी संबंधित कागदपत्रांची तपासणी करण्यात यावी. आमच्या आक्षेपावर योग्य चौकशी करून कारणांसह लेखी निर्णय देण्यात यावा, अशी मागणी शिंदे यांनी केली. प्राथमिक मतदार यादीत नाव समाविष्ट असलेल्या संबंधित व्यक्तीचे त्या संस्थेतील सभासदत्व अस्तित्वात असल्याबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे. संबंधित संस्थेची मूळ सभासद नोंदवही, सभासदत्व मंजूर करणारा ठराव, प्रवेश अर्ज, सभासद क्रमांक आणि अन्य अधिकृत अभिलेख तपासून संबंधित व्यक्तीचे सभासदत्व आणि मतदार म्हणून तिची पात्रता निश्चित करण्यात यावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.