परभणीच्या सुवर्ण बुद्धभूमीत भव्य धम्मसोहळा

परभणीच्या सुवर्ण बुद्धभूमीत भव्य धम्मसोहळा
Published on: 

‘अत्त दीप भव’मधून विश्वकल्याणाचा संदेश
परभणीच्या सुवर्ण बुद्धभूमीत भव्य धम्मसोहळा; बुद्धविचारांचा प्रसार करण्याचा संकल्प
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : प्रेम, करुणा, अहिंसा, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांचा स्वीकार करून प्रत्येकाने बुद्ध धम्माच्या मार्गावर वाटचाल करावी. तथागत भगवान बुद्धांचा ‘अत्त दीप भव’ हा संदेश आत्मप्रकाशातून संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचा मार्ग दाखवणारा आहे, असे प्रतिपादन थायलंड येथील भदन्त साँगसाक कोविड यांनी केले.
परभणी जिल्ह्यातील उमरी-मांडाखळी येथील नियोजित सुवर्ण बुद्धभूमीच्या १० एकर परिसरात नुकताच भव्य धम्मसोहळा पार पडला. आश्रय सेवाभावी संस्था आणि गगन मलिक फाउंडेशन यांच्या पुढाकाराने तसेच डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्या आयोजनातून हा सोहळा झाला. या वेळी आयोजित धम्मदेशनेत भदन्त साँगसाक कोविड यांनी बुद्धांच्या विचारांचे महत्त्व विशद केले.

पन्नास फूट उंच धम्म ध्वजाचे ध्वजारोहण
कार्यक्रमाच्या प्रारंभी भिक्खू संघाच्या हस्ते ५० फूट उंच पंचशील धम्म ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. भिक्खू संघाने उपस्थितांना त्रिशरण-पंचशील दिले. सामूहिक बुद्धवंदनेमुळे संपूर्ण परिसर धम्ममय झाला. या सोहळ्याला अखिल भारतीय भिक्खू महासंघाचे कार्याध्यक्ष भदन्त डॉ. उपगुप्त महाथेरो, थायलंड येथील भदन्त साँगसाक कोविड, भदन्त थेरायुत चट्टामालो, चायुटपोंग धम्मधारो आणि भदन्त शरणानंद महास्थवीर यांच्यासह भिक्खू संघातील सदस्य उपस्थित होते.

बुद्धमूर्तींचे वाटप
सोहळ्याचे आयोजक डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी भिक्खू संघाचे स्वागत केले. तसेच थायलंड येथून आणलेल्या बुद्धमूर्ती विविध महिला मंडळे आणि उपासक-उपासिकांना वितरित केल्या. प्रत्येक विहारापर्यंत बुद्धांचे विचार पोहोचविण्याच्या संकल्पाला या उपक्रमामुळे बळ मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
...
‘‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनुसार भारत बौद्धमय करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. उमरी-मांडाखळी येथील सुवर्ण धम्मभूमीत लवकरच भव्य बुद्धविहाराच्या उभारणीला सुरुवात करण्याचा आमचा मानस आहे.’’
- डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबिरे, आयोजक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com