रेल्वेच्या गोंधळात तिघांचा गेला जीव

रेल्वेच्या गोंधळात
तिघांचा गेला जीव
Published on: 

रेल्वेच्या गोंधळात
तिघांचा गेला जीव
मुंबई, ता. २६ : मध्य रेल्वेच्या सोमवारी झालेल्या बिघाडामुळे प्रवाशांचे दिवसभर प्रचंड हाल झाले. याच गोंधळात भांडुप स्थानकात रेल्वे रूळ ओलांडताना एसी लोकलच्या धडकेत साहिल थिटे (वय २१) या तरुणाचा मृत्यू झाला. दुसरीकडे घाटकोपर आणि विक्रोळी स्थानकांदरम्यान दोन अनोळखी मृतदेह आढळले, तसेच रेल्वे रुळांवरून चालत जाणारे दोन जण जखमी झाल्याने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
साहिल हा मुलुंडच्या अमरनगर परिसरात राहत असून, तो भांडुप नाइट हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये शिकत होता. लोकल पकडण्यासाठी तो भांडुप स्थानकातील फलाट क्रमांक चारवर उभा होता. त्याच वेळी फलाट क्रमांक दोनवर लोकल येत असल्याची उद्घोषणा झाल्यानंतर तिथे लवकर पोहोचण्यासाठी त्याने रूळ ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी फलाट क्रमांक तीनच्या रुळांवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून कल्याणच्या दिशेने एसी लोकल धावत होती. या लोकलची जोरदार धडक बसल्याने साहिलचा मृत्यू झाल्याची माहिती वरिष्ठ रेल्वे पोलिस अधिकाऱ्याने दिली.
---
रुळांवर आढळले दोन मृतदेह
घाटकोपर आणि विक्रोळी स्थानकांदरम्यान रेल्वे रुळावर दोन मृतदेह आढळले. मोटरमनच्या ही बाब निदर्शनास आल्याची माहिती लोहमार्ग पोलिस उपायुक्तांनी दिली. दोन्ही मृतांची ओळख आणि मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नसल्याचेही पोलिसांनी सांगितले.

रुळांवरून चालताना दोघे जखमी
मध्य रेल्वेची लोकल सेवा विलंबाने धावत असल्याने रुळांवरून चालत जाणाऱ्या दोन जणांना जखमी अवस्थेत राजावाडी रुग्णालयात आणण्यात आले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. दोघांच्या दुखापतीचे कारण आणि घटनेचा सविस्तर तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com