झोपडपट्ट्यांच्या समूह पुनर्विकासातून एसआरए मालामाल होणार

झोपडपट्ट्यांच्या समूह पुनर्विकासातून एसआरए मालामाल होणार
Published on: 

झोपडपट्ट्यांच्या समूह पुनर्विकासातून एसआरए मालामाल होणार
प्रीमियमच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये मिळणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : मुंबईला झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून (एसआरए) जुहू गल्ली येथील शंभर एकराहून अधिक झोपडपट्टी समूह क्षेत्राबरोबरच मुंबईतील वेगवेगळ्या १६ ठिकाणी झोपडपट्ट्यांचा समूह पुनर्विकास केला जाणार आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना पक्के घर मिळणार असून, एसआरए प्राधिकरणही प्रीमियमच्या माध्यमातून मालामाल होणार आहे. झोपडपट्टी असलेल्या भूखंडाच्या रेडीरेकनर दराच्या सुमारे २५ टक्के रक्कम प्रीमियम म्हणून उपलब्ध होणार आहे. त्यापैकी १० टक्के रक्कम एसआरएला मिळणार असल्याने एकूण समूह पुनर्विकासाचा विचार करता भविष्यात एसआरएला कोट्यवधी रुपये उपलब्ध होऊ शकणार आहेत.
झोपडपट्टी परिसराचा एकल पुनर्विकास प्रकल्प न राबवता ५० एकरापेक्षा जास्त भूखंडावर असलेल्या झोपडपट्टीचा समूह पुनर्विकास करण्यासाठी एसआरएकडून भर दिला जात आहे. त्यानुसार जुहू गल्लीतील सुमारे १०० एकर भूखंडवरील झोपडपट्टीनंतर मुंबईतील आणखी आठ दाट लोकवस्तीच्या झोपडपट्टी समूह क्षेत्र पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये एच/पूर्व विभागातील बेहरामपाडा (सुमारे १०९ एकर), के/पूर्व विभागातील मजासवाडी (सुमारे २६२ एकर) आणि एफ/उत्तर विभागातील अँटॉप हिल (सुमारे ३५९ एकर), ओशिवरा बेहराम बाग (१४९ एकर), मानखुर्द शिवाजीनगर (२२६) एकर, कांदिवली पूर्व, कांदिवली पश्चिमेकडील पोयसर, म्हाडा लेआऊट वगळून विक्रोळी कन्नमवारनगर (१३६ एकर) येथील झोपडपट्टीचा पुनर्विकास प्रस्तावित केला जाणार आहे. याशिवाय अनेक ठिकाणी समूह पुनर्विकास राबवला जाणार आहे. त्यामाध्यमातून प्रीमियम रूपाने मोठा निधी एसआरएला उपलब्ध होऊ शकेल, अशी माहिती एसआरएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने सांगितले.

किती प्रीमियमची तरतूद?
झोपडपट्टी समूह पुनर्विकास प्रकल्प राबवताना जेवढ्या परिसर एसआरए म्हणून जाहीर झाला आहे, त्या भूखंडाच्या रेडिरेकनर दराच्या २५ टक्के आणि अधिकची १० टक्के अशी एकूण ३५ टक्के रक्कम प्रीमियम म्हणून उपलब्ध होते. त्यापैकी ९० टक्के रक्कम जमीन मालकाला तर उर्वरित १० टक्के रक्कम एसआरएला देण्याची तरतूद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com